शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी तुफान गोळीबार करत असताना ड्रायव्हरनं दाखवलं प्रसंगावधान, अन्यथा आणखी प्रवाशांचे गेले असते प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 15:59 IST

Reasi Terror Attack News: जम्मूमधील रियासी परिसरात दहशतवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला. यात्रेकरूंना घेऊन जात असलेल्या बसला लक्ष्य करून करण्यात हा हल्ला घडवून आणण्यात आला‌. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली. त्यात ९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले होते‌. 

जम्मूमधील रियासी परिसरात दहशतवाद्यांनी एक मोठा हल्ला घडवून आणला. यात्रेकरूंना घेऊन जात असलेल्या बसला लक्ष्य करून करण्यात हा हल्ला घडवून आणण्यात आला‌. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केल्यानंतर बस दरीत कोसळली. त्यात ९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले होते‌. 

दरम्यान, हा हल्ला होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात रविवारी सायंकाळी ही बस कटराच्या दिशेने जाताना दिसत आहे. मात्र काही वेळातच या बसवर हल्ला होतो. तसेच दहशतवादी बसवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात करतात. यादरम्यान बसचा चालक प्रसंगावधान दाखवून ही बस घटनास्थळापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. मात्र यादरम्यान त्यालाही गोळी लागली.त्यामुळे बसवरील त्याचं नियंत्रण सुटून ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत जाऊन कोसळली. मात्र ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील अनेक प्रवाशांचे प्राण वाचले. तसेच त्यापैकी अनेकजण केवळ किरकोळ जखमी झाले. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवलं नसतं तर मोठा नरसंहार घडला असता. दरम्यान, या हल्ल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. लष्कराच्या गणवेशासारखे कपडे घातलेल्या दहशतवाद्यांनी बसवर हल्ला केला. त्यानंतर जवळच्या जंगलात जाऊन लपले. दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या हल्ल्याची दखल घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच पीडितांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद