"खरंच, तुम्ही बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलंय?"; स्मृती इराणींनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 14:26 IST2023-08-14T14:19:28+5:302023-08-14T14:26:00+5:30

आस्क मी एनथिंग सेशनमध्ये स्मृती इराणी यांना जुबेन इराणींच्या पहिल्या पत्नीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता

Really, you're married to your childhood friend's husband? Answered by Smriti Irani | "खरंच, तुम्ही बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलंय?"; स्मृती इराणींनी दिलं उत्तर

"खरंच, तुम्ही बालपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलंय?"; स्मृती इराणींनी दिलं उत्तर

नवी दिल्ली - भाजपा नेत्या आणि केंद्रीयमंत्रीस्मृती इराणी सध्या राहुल गांधींच्या फ्लाइंग किसच्या मुद्द्यावरुन चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर, त्यांचा पतीसमवेतचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. जुनाच फोटो नव्याने व्हायरल करत नेटीझन्सने सवाल केला आहे. खरंच, तुम्ही तुमच्या मैत्रीणीच्या पतीसोबत लग्न केले का? असा प्रश्न या फोटोसह नेटीझन्स विचारत आहेत. त्यावर, आता स्वत: स्मृती इराणी यांनी उत्तर दिलंय. स्मृती इराणी यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवर #AskmeAnything सेशन केलं. त्यामध्ये त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं.

आस्क मी एनथिंग सेशनमध्ये स्मृती इराणी यांना जुबेन इराणींच्या पहिल्या पत्नीसंदर्भातील प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, मोना ही माझी बालपणीची मैत्रिण नाही, असे स्पष्ट केले. इंस्टाग्रामवरील सेशनमध्ये स्मृती इराणी यांनी सर्वच प्रश्नांची सहज व सरळ उत्तरे दिली. त्यामध्ये, एका युजर्सने विचारले की, खरंच, तुम्ही तुमच्या लहानपणीच्या मैत्रिणीच्या पतीसोबत लग्न केलं का? या प्रश्नावर स्मृती यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.

''नाही ओ... मोना माझी बालपणीची मैत्रीण नाही. मोना माझ्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी आहे.  त्यामुळे, ती माझी लहानपणीची मैत्रीण असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ती कुटुंबवत्सल आहे, ती राजकारणी नाही. तिला यात नका ओढू. माझ्यासोबत लढा, माझ्याशी वाद-विवाद करा, मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करा. मात्र, ज्या व्यक्तीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, त्यास या गटारात नका ओढू, ती सन्मानास पात्र आहे,'' असे परखड आणि स्पष्ट उत्तर स्मृती इराणी यांनी इंस्टा युजर्सच्या प्रश्नाला दिले आहे.

दरम्यान, स्मृती इराणी यांनी यापूर्वी सिनेसृष्टीत काम केलं आहे. क्यों की सास भी कभी बहु थी... या मालिकेत सासूची भूमिका निभावली होती. त्यांची ही मालिका आणि त्यांचे पात्र लोकप्रिय झाले. मात्र, राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला. सध्या त्या मोदी सरकारमध्ये केंद्रीयमंत्री म्हणून कार्यरत आहेत. 
 

Web Title: Really, you're married to your childhood friend's husband? Answered by Smriti Irani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.