शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा आणि काँग्रेस नेत्यांच्या मुलांची 'सैराट' प्रेमकहाणी; जात वेगळी असल्यामुळे लग्नाला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 16:09 IST

या प्रेमीयुगुलातील मुलीचे वडील हे भाजपात असून माजी मंत्री होते, तर मुलाचे वडील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

नवी दिल्ली: नुकत्याच होऊन गेलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वेळ काँग्रेस आणि भाजपातील हाडवैरामुळे वाया गेला होता. भारतीय राजकारणात ही बाब काही नवीन नाही. मात्र, कर्नाटकात हेच पक्षीय वैर प्रेमीयुगुलाच्या भविष्यात अडथळा ठरत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे संपूर्ण प्रकरण एखाद्या चित्रपटात शोभावे असेच आहे. या प्रेमीयुगुलातील मुलीचे वडील हे भाजपात असून माजी मंत्री होते, तर मुलाचे वडील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एरवी दोन्ही पक्षांकडून सतत आम्ही धर्म किंवा जातपात मानत नाहीत, असा प्रचार केला जातो. मात्र, या प्रकरणात जात वेगळी असल्यामुळे या दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केला आहे. या जोडप्यापैकी मुलगी ही पेशाने इंजिनियर आहे. माझे वडील दुसऱ्या मुलाशी लग्न करण्यासाठी माझ्यावर दबाव आणत होते, असे या मुलीने सांगितले. अखेर या दोघांनी पळून जाऊन गुलबर्गा येथे विवाह केला. त्यानंतर मुलीचे वडील आणि भावाकडून या दोघांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे या दोघांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग या दोघांचा खटला लढवत आहेत. न्यायालयाने या दोघांना कर्नाटकच्या अतिरिक्त महाधिवक्त्यांकडे बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. सुरक्षेच्या कारणास्तव या दोघांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. पुढील महिन्यात या प्रकरणाची सुनावणी होणे अपेक्षित आहे. मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीरदृष्या प्रौढ असलेल्या दोन व्यक्तींच्या लग्नात कोणीही अडथळा आणू शकत नाही, असा निकाल दिला होता. 

टॅग्स :BJPभाजपाrelationshipरिलेशनशिपLove Jihadलव्ह जिहाद