शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

"कुठल्याही मदतीसाठी तयार', रशियानं यूक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांनंतर भारतानं दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 20:16 IST

भारताने युक्रेन युद्ध पुन्हा भडकल्याने सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचा निर्णय कुणाच्याही हिताचा नाही. यामुळे सर्व पक्षांनी शत्रुत्व टाळून तत्काल मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा, असे भारताने म्हटले आहे.

रशियाने युक्रेनवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यांसंदर्भात भारताने प्रतिक्रिया दिली आहे. युद्ध भडकणे कुणाच्याही हिताचे नाही, असे भारताने म्हटले आहे. याच वेळी मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमाने मार्ग काढावा, असा आग्रहही भारताने  केला आहे. एवढेच नाही, तर आपण तणाव कमी करण्याच्या दृष्टीने कोणत्याही मदतीसाठी तयार आहोत, असेही भारताने म्हटले आहे.

भारताने युक्रेन युद्ध पुन्हा भडकल्याने सोमवारी चिंता व्यक्त केली आहे. युद्धाचा निर्णय कुणाच्याही हिताचा नाही. यामुळे सर्व पक्षांनी शत्रुत्व टाळून तत्काल मुत्सद्देगिरी आणि संवादाचा मार्ग स्वीकारायला हवा, असे भारताने म्हटले आहे. गेल्य काही दिवसांच्या शांततेनंतर रशियाने सोमवारी युक्रेनच्या काही भागांवर मिसाइल हल्ले केल्यानंतर, माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

बागची म्हणाले, ‘‘आम्ही सर्व पक्षांना तत्काळ शत्रुत्वाचा त्याग करून कूटनिती आणि संवादाच्या मार्गावर परतण्याचे आवाहन करत आहोत. तसेच, स्थिती सामान्य करण्याच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व प्रयत्नांसाठी भारत तयार आहे. युक्रेनमधील संघर्ष पुन्हा भडकल्याने भारत चिंतित आहे. कारण यात पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले आणि अनेकांचा मृत्यू झाला."

रशियाने 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली - युक्रेनच्या म्हणण्यानुसार, रशियाने युक्रेनवर 24 तासांत 75 क्षेपणास्त्रे डागली आहेत. एजन्सी रिपोर्टनुसार, रशियन हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झाला, तर 24 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रशियन हल्ल्यात लिव्ह, पोल्टावा, खार्किव, कीव या शहरांतील अनेक भाग जळून खाक झाले आहेत. या शहरांमधील इंटरनेट सेवाही बंद झाली आहे. या हल्ल्यात डझनहून अधिक गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाIndiaभारतwarयुद्ध