शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

CoronaVirus: व्हॉट्सअ‍ॅपवर एक्स-रे पाठवा, कोरोना आहे की नाही ते कळेल; मोफत XraySetu सेवा लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 20:03 IST

how Centre's X-Ray Setu on WhatsApp can detect Corona: ही सुविधा ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. सध्या यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाहीय. चला जाणून घेऊया XraySetu काय आहे, कसे वापरावे....

केंद्र सरकारने कोरोना संकटाच्या काळात देशवासियांसाठी एक मोठा दिलासा देणारे पाऊल उचलले आहे. कोरोना आहे की नाही हे मिनिटांत कळण्यासाठी XraySetu सुविधा मोफत देऊ केली आहे. याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर छातीचा एक्स-रे पाठवून कोरोनाची बाधा आहे की नाही हे कळविले जाणार आहे. (Know how Centre's X-Ray Setu on WhatsApp can detect Covid-19)

ही सुविधा ग्रामीण भागात राहणाऱ्यांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. सध्या यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाहीय. चला जाणून घेऊया XraySetu काय आहे, कसे वापरावे....

खरेतर XraySetu हे एक एआय बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. जो व्हॉट्सअ‍ॅपवर ऑपरेट केला जातो. ही सुविधा इंडियन इन्स्टट्यूट ऑफ सायन्स (IISc) द्वारे स्थापित एनजीओ Artpark (AI & Robotics Technology Park) आणि भारत सरकारच्या विद्यमाने सुरु करण्यात आली आहे. ही सेवा डिपार्टमेंट ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी (DST)ने एक हेल्थटेक स्टार्टअप Niramai सोबत मिळून डेव्हलप केली आहे. 

ग्रामीण भागात छोट्या छोट्या हॉस्पिटलमध्ये एक्स रे सुविधा असते. मात्र, या भागात RT-PCR  किंवा CT-Scan करणे कठीण असते. लोकांना परवडणारे देखील नसते. यामुळे XraySetu द्वारे एक्स रे वरून कोरोना आहे की नाही याची माहिती मिळणार आहे, असे  Artpark चे सीईओ उमाकांत सोनी यांनी सांगितले. 

- पुढील सहा ते 8 महिने ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. जरी शुल्क असले तरीदेखील ते 100 रुपयांपेक्षा कमी असेल. ही सुविधा गेल्या आठवड्यापासून सुरु झाली असून 500 डॉक्टर याचा वापर करत ाहेत. पुढील 15 दिवसांत 10000 डॉक्टरांचे नेटवर्क बनविण्याची योजना आहे. - एक्स रे पाठविल्यावर 10 ते 15 मिनिटांत त्याचा रिपोर्ट तयार केला जातो. लो रिझोल्युशनच्या एक्सरेवरूनही कोरोना बाधित तपासता येणार आहे. 

XraySetu कसे काम करणार...

  • https://wwww.xraysetu.com वर जावे. ‘Try the Free X-raySetu Beta’ बटनावर क्लिक करावे. 
  • दुसऱ्या पेजवर गेल्यावर तुमच्या वेब किंवा स्मार्टफोनमध्ये वॉट्सऐप-बेस्ड चॅटबोट निवडू शकता. 
  • तो डॉक्टरला XraySetu सेवा सुरु करण्यासाठी +91 8046163838 या क्रमांकावर मेसेज पाठविण्यास सांगेल. 
  • रुग्णाचा छातीचा एक्सरे काढलेला फोटो तिथे पाठवावा लागणार आहे. यानंतर काही वेळातच ऑटोमेटेड रिपोर्ट देण्यात येईल.  
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप