(वाचली) व्हीनस कॉर्नर येथे उसाचा ट्रॅक्टर उलटला
By Admin | Updated: January 14, 2015 00:06 IST2015-01-14T00:06:41+5:302015-01-14T00:06:41+5:30
कोल्हापूर : आसुर्ले पोर्ले येथील दालमिया शुगर्सला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच-२३पी- ८८७५) व्हीनस कॉर्नर येथे आज, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास उलटला. पाठीमागच्या ट्रॉलीचे चाक निखळल्यामुळे ही घटना घडली. रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅक्टरमालकाचे नाव मुरली कारभारी माने (वय २६, रा. बीड) असे आहे. डबल ट्रेलर ट्रॅक्टरमध्ये सुमारे सोळा टन ऊस भरलेला होता. मागील ट्रेलरच्या उजव्या बाजूचे चाक निखळून पडल्याने ट्रेलर पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला. हा अपघात पाहण्यास बघ्यांची गर्दी झाली होती. शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल एस. पी. गुरव व आर. एम. तळपी यांनी दुसर्या ट्रॅक्टरमधून ऊस भरून पुढे पाठविला.

(वाचली) व्हीनस कॉर्नर येथे उसाचा ट्रॅक्टर उलटला
क ल्हापूर : आसुर्ले पोर्ले येथील दालमिया शुगर्सला ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (एमएच-२३पी- ८८७५) व्हीनस कॉर्नर येथे आज, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास उलटला. पाठीमागच्या ट्रॉलीचे चाक निखळल्यामुळे ही घटना घडली. रस्त्यावर वर्दळ नसल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅक्टरमालकाचे नाव मुरली कारभारी माने (वय २६, रा. बीड) असे आहे. डबल ट्रेलर ट्रॅक्टरमध्ये सुमारे सोळा टन ऊस भरलेला होता. मागील ट्रेलरच्या उजव्या बाजूचे चाक निखळून पडल्याने ट्रेलर पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला. हा अपघात पाहण्यास बघ्यांची गर्दी झाली होती. शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल एस. पी. गुरव व आर. एम. तळपी यांनी दुसर्या ट्रॅक्टरमधून ऊस भरून पुढे पाठविला.