शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"लोक मरत होते अन् उत्सव सुरू होता, तेव्हा अल्लू अर्जुनला अटक केली, मग इथे का नाही?" बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 14:10 IST

बंगळुरू चेंगराचेंगरीवरून भाजपचा सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांच्यावर हल्लाबोल

बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर RCB च्या विजयी मिरवणुकीपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनावर लोक जखमी झाल आहेत. यावरू आता विरोधकांनी कर्नाटक सरकारला घेरले आहे. ही घटना म्हणजे, 'सरकारी अपयश' आणि 'राजकीय लालसे'चा परिणाम असल्याचे भाजपने म्हटले आहे. यासंदर्भात भाजपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ही केवळ चेंगराचेंगरीच नव्हती, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील भांडणातून निर्माण झालेली सरकारनिर्मित दुर्घटना होती."

राहुल गांधीवर थेट निशाणा - भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, "राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भारतीय लष्कराची खिल्ली उडवत असतात. मात्र, एका दुर्घटनेत एवढ्या लोकांचा मृत्यू झाला असताना राहुल गांधी कोठे आहेत?" एवढेच नाही तर, राहुल गांधी यांनी या संदर्भात तत्काळ कारवाई करावी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना दिल्लीला हजर राहण्याचे आदेश द्यावेत.

"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा" -पात्रा म्हणाले, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेत मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा. तसेच, डीके शिवकुमार  यांनी जनतेची माफी मागायला हवी.

“लोक मरत होते आणि तेथे उत्सव सुरू होता” -दुर्घटनेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणासंदर्भात बोलतान भाजपने म्हटले आहे की, "जेव्हा लोक मरत होते, तेव्हा तेथे उत्सव साजरा केला जात होता. आजही 50 लोक रुग्णालयात दाखल आहेत."

"3 लाख लोक पोहोचलेच कसे?"दुर्घटनेसंदर्भात भाष्य करताना, "तेथे 300000 लोक कसे पोहोचले? त्यांना परवानगी दिली गेली होती? जर पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, तर ही विजयी मिरवणूक निघली कशी? असे प्रश्नही भाजपने उपस्थित केले आहेत.

"तेव्हा अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली, तर मग इथे का नाही?" -यावेळी भाजपने गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेता अल्लू अर्जुनसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण करून देत, अभिनेता अल्लू अर्जुनला चेंगरा चेंगरीच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. तर मग या प्रकरणात डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यावर कार्रवाई का होऊ नये? असा सवालही भाजपने केला आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी