शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

RBI vs Govt: ऊर्जित पटेलांना मोदींची 'भेट', वादावर पडदा पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 10:56 IST

केंद्र सरकार आणि आरबीआयमधील वाद लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.

नवी दिल्ली- केंद्र सरकार आणि आरबीआयमधील वाद लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची भेट घेतली होती, तसेच या भेटीत दोघांचेही एका फॉर्म्युल्यावर एकमत झाले आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या फॉर्म्युल्यानुसार केंद्र सरकार आरबीआयकडून पैसे मागण्यासंदर्भात नरमाईची भूमिका घेणार आहे, तर आरबीआयही केंद्राला कर्ज देण्यात थोडी सूट देणार आहे. या फॉर्म्युल्यांतर्गत आरबीआय काही बँकांनी करेक्टिव एक्शन (पीसीए) फ्रेमवर्कमधून बाहेर काढणार आहे. जेणेकरून बँक अधिक कर्ज देऊ शकेल.कमी भांडवल आणि बँकांनी भरमसाट दिलेल्या कर्जाच्या समस्यांमुळे आरबीआयनं बँकांवर कर्ज देण्यासंदर्भात काही बंधनं घातली होती. ज्या बँकांनी भरमसाट कर्जे वाटप केली, त्या 11 बँकांवर कर्ज देण्यासंदर्भात मर्यादा घातल्या होत्या. ज्या बँका स्वतःचं भाग भांडवल वाढत नाहीत. त्या बऱ्याचदा तोट्यात जातात. केंद्र सरकार आणि आरबीआयचं काही बँकांना पीसीएतून बाहेर ठेवण्यावर सहमती झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना पदावरून दूर करणार नाही, असे संकेत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले होते.सरकार आणि केंद्रीय बँकेत मतभेद होणे ही काही नवी बाब नाही. यापूर्वीच्या अनेक सरकारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ऊर्जित पटेल यांचा कार्यकाळ पुढील वर्षी ऑगस्टमध्ये संपत आहे. ते तो पूर्ण करतील. सुमारे 10 दिवसांपूर्वी सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील तणावाला प्रारंभ झाला होता. आरबीआय कायद्याच्या कलम 7 अन्वये सरकारने रिझर्व्ह बँकेसोबत औपचारिक चर्चा करण्याचे प्रस्तावित केल्यामुळे पटेल हे राजीनामा देतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUrjit Patelउर्जित पटेल