शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीने काळ्या पैशाला चाप बसणार नाही, RBI ने दिला होता मोदींना इशारा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 16:33 IST

नोटाबंदीच्या निर्णयाने काळ्या पैशाला आळा बसणार नाही असा इशारा आरबीआय बोर्ड सदस्यांनी नरेंद्र मोदी यांना दिला होता. तरीही नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्या होत्या. नरेंद्र मोदी सरकारने हा घेतलेल्या या निर्णयाला ऐतिहासिक निर्णय म्हटलं जातं होतं. मात्र नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयचे बोर्ड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. 

टाइम्स ऑफ इंडीया यांनी दिलेल्या वृत्तानुसार 8 नोव्हेंबर 2016 रोजी संध्याकाळी साडे पाच वाजता आरबीआय बोर्डाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारने आरबीआयला सांगितल्याप्रमाणे 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात बाजारात चलनात आल्या आहेत या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र बोर्डातील सदस्यांनी महागाईच्या तुलनेत वाढलेल्या चलनाचं प्रमाण नगण्य आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले. 

केंद्र सरकारने 2011-12 या वर्षीच्या तुलनेत 2015-16 या कालावधीत अर्थव्यवस्थेत 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला. त्यावेळी 500 रुपयांच्या 76 टक्के आणि 1000 रुपयांच्या 109 टक्के वाढ झाली होती. त्यामुळे जवळपास 400 करोड बनावट नोटा बाजारात चलनात आल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला. मात्र बोर्ड सदस्य केंद्र सरकारच्या अंदाजावर असहमती दर्शवली. आरबीआय बोर्डाच्या सदस्यांनी सांगितले की, काळा पैसा हा रोख स्वरुपात न वापरता सोने आणि मालमत्तेच्या रुपात गुंतवणूक केली जाते. त्यामुळे नोटबंदीमुळे काळ्या पैशाला आळा बसण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतील असं मतं बैठकीत मांडण्यात आले होते.  

 

या बैठकीला कोण कोण उपस्थित होते ?उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आरबीआय बोर्डाची बैठक झाली. या बैठकीत आरबीआयचे विद्यमान गर्व्हनर शक्तिकांत दास, आर गांधी, एसएस मुंदडा सहभागी होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयावर विरोधकांपासून अर्थतज्ज्ञांनीही नाराजी व्यक्त केली होती. नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्थ डबघाईला आली असा आरोप विरोधकांनी केला होता.तर नोटबंदीचे समर्थन करत केंद्र सरकारने नोटबंदीमुळे काळा पैशाला आळा बसला, दहशतवाद रोखण्यासाठी नोटबंदीचा फायदा झाला असल्याचा दावा केला. मात्र लोकसभा निवडणूक जाहीर झाली असताना नोटबंदीच्या निर्णयावरून पुन्हा मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील हे नक्की

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Demonetisationनिश्चलनीकरणReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदी