शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 07:01 IST

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीतील व्यक्तींना यापूर्वी दहशतवादी कारवायांच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. २००६ मध्ये वेरूळ येथे १० एके ४७ रायफल्स, गोळाबारूदसह आरडीएक्स पकडण्यात आले होते.

डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या स्लीपर सेलची महत्त्वाची भूमिका समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू केले आहे. ‘ॲापरेशन सिंदूर’नंतर सुरू झालेल्या या मोहिमेत महाराष्ट्रातील संशयित स्लीपर सेलच्या हालचालींचा आढावा वरिष्ठ पातळीवरून घेण्यात येत आहे.मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणीतील व्यक्तींना यापूर्वी दहशतवादी कारवायांच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. २००६ मध्ये वेरूळ येथे १० एके ४७ रायफल्स, गोळाबारूदसह आरडीएक्स पकडण्यात आले होते. यात बीडच्या जबियोद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याचा सहभाग होता. त्यानेच कसाबला हिंदी भाषा शिकवली होती. त्याला राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने यूएई येथून आणले. तो लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. 

या पथकाने संशयित व्यक्ती, संभाव्य स्लीपर सेल यांच्या माहितीबरोबरच संवेदनशील ठिकाणांना (व्हायटल इन्स्टाॅलेशन) भेटी देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केल्याचेही समजते. स्लीपर सेल ॲक्टिव्हेट झाल्यास नुकसान पोहोचू शकणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.  

संवेदनशील ठिकाणांना भेटीजागतिक वारसा असलेल्या वेरूळ, अजिंठासह जायकवाडी धरण आणि  नांदेडमधील गुरुद्वारा, परळी वैजनाथ व घृष्णेश्वर येथे त्यांनी भेटी दिल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासनाकडून स्वतंत्रपणे सर्व व्हायटल इन्स्टाॅलेशन्सच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. अशीच कारवाई राज्याच्या इतर भागांतही सुरू असल्याचे समजते. मराठवाड्यात यापूर्वी सिमी व नंतर पीएफआय सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. काहींचे ‘इसीस’शी संबंध उघडकीस आले आहेत. एनआयए व राज्य दहशतवादविरोधी पथकांनी मराठवाड्यातील अनेक ठिकाणी छापे मारून अनेकांना ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला