रविंद्र जाडेजाच्या लग्नात हवेत गोळीबार
By Admin | Updated: April 17, 2016 20:49 IST2016-04-17T19:51:11+5:302016-04-17T20:49:58+5:30
गोळीबारामुळे क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाच्या लग्न सोहळयाला रविवारी वादाचे गालबोट लागले. रविंद्र जाडेजाचा रविवारी विवाहसोहळा पार पडला.

रविंद्र जाडेजाच्या लग्नात हवेत गोळीबार
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. १७ - गोळीबारामुळे क्रिकेटपटू रविंद्र जाडेजाच्या लग्न सोहळयाला रविवारी वादाचे गालबोट लागले. रविंद्र जाडेजाचा रविवारी विवाहसोहळा पार पडला. यावेळी लग्नाच्या वरातीमध्ये जाडेजाच्या काही नातेवाईकांनी हवेत गोळीबार केला. जाडेजापासून काही फूट अंतरावर हा गोळीबार झाला.
सुदैवाने यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरु केला. जाडेजाच्या नातेवाईकांनी गोळीबार केल्याचे व्हिडीओ फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. स्वसंरक्षणा व्यतिरिक्त परवानाधारक बंदूक अशा प्रकारे वापरणे बेकायद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस व्हिडीओ फुटेज तपासत असून, गुन्हा सिद्ध झाल्यास दोषीला तीन वर्षांचा कारावास होऊ शकते असे लोधीका पोलिस स्थानकातील पीएसआय महेंद्रसिंह राणा यांनी सांगितले. याआधी रविंद्र जाडेजा संगीत सोहळयामध्ये त्याचे तलवारबाजीचे कौशल्य दाखवत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. रिवा सोलंकीबरोबर जाडेजा विवाहबद्ध होत आहे. रविंद्र आणि रिवाचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात साखरपुडा झाला होता.