शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 10:22 IST

महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यातील मुख्य आरोपी रवी उप्पल हा यूएईमधून फरार झाल्याचा दावा केला जात आहे.

Mahadev Betting App Scandal: ६००० कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात एक मोठे नाट्यमय वळण आले आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आरोपी रवी उप्पल दुबईतून अचानक पसार झाल्याने भारतीय तपास यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारावर दुबई पोलिसांनी उप्पलला अटक केली होती. त्यानंतर, भारत सरकारने तातडीने आणि अधिकृत राजनैतिक माध्यमांतून संयुक्त अरब अमिरातकडे त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. मात्र, आता यूएईने ही विनंती मिळाली नसल्याचा दावा करत उप्पलला कोठडीतून सोडून दिले आणि तो गायब झाला.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आरोपीच्या अटकेनंतर ४५ ते ६० दिवसांच्या आत प्रत्यार्पण विनंती पाठवणे बंधनकारक असते. भारताने ती  विनंती वेळेत आणि पुराव्यांसह पाठवल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याउलट, यूएईने अशी कोणतीही विनंती करण्यात आली नसल्याचे म्हटले. त्यामुळे त्यांनी रवी उप्पलला सोडून दिले.  यूएईने भारताला त्याची सुटका आणि तो कोणत्या देशात गेला, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधामध्ये पहिल्यांदाच तणाव निर्माण झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेही तीव्र नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केले आहे. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने आरोपी उप्पलच्या गायब होण्याच्या कृतीवर तीव्र संताप व्यक्त केला. "हे न्यायालयाच्या विवेकाला धक्का देणारे आहे. आम्ही अशा गुन्हेगारांना न्यायालयांना आणि तपास यंत्रणांना खेळणं बनवण्याची परवानगी देऊ शकत नाही. आता काहीतरी करावेच लागेल," अशा शब्दांत कोर्टाने नाराजी व्यक्त केली.

सुप्रीम कोर्टाने ईडीला उप्पलचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करण्याचे थेट निर्देश दिले आहेत. ईडीकडून बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी कोर्टाला माहिती दिली की, असे आर्थिक गुन्हेगार अनेकदा ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्ससारख्या देशांमध्ये पळून जातात, जिथे भारताचे प्रत्यार्पण करार नाहीत.

महादेव ऑनलाईन बुक ॲपचा वापर भारतात अवैध सट्टेबाजी, हवाला आणि मनी लॉन्ड्रिंगसाठी केला जात होता. हा घोटाळा सुमारे ६,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा असून तो अनेक राज्यांमध्ये पसरलेला आहे. या सिंडिकेटचा दुसरा प्रमुख प्रमोटर सौरभ चंद्राकर यालाही इंटरपोल नोटीसच्या आधारावर दुबईत ऑक्टोबर २०२४ मध्ये अटक करण्यात आले असून, त्याचे प्रत्यार्पण अद्याप प्रलंबित आहे. या प्रकरणात कथितरित्या ५०० कोटींहून अधिक लाचेचा संबंध छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्याशी जोडला गेला होता. या प्रकरणाचा तपास आधी छत्तीसगड पोलिसांकडे होता, जो नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला. 

English
हिंदी सारांश
Web Title : UAE's Betrayal? Betting App Kingpin Vanishes; Indian Supreme Court Furious

Web Summary : Ravi Uppal, key in a ₹6000 crore betting app scam, fled Dubai after his arrest. Despite India's extradition request, UAE denies receiving it, sparking diplomatic tension and Supreme Court anger. The court ordered Uppal's swift arrest, exposing potential escapes to havens lacking extradition treaties.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय