रेशनकार्डचे अपडेट्स आता मोबाईलवरही मिळणार; इंटरनेट नसले तरी नो टेन्शन, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 09:03 AM2022-01-22T09:03:00+5:302022-01-22T09:05:01+5:30

‘वन नेशन, वन रेशन’मोहिमेंतर्गत अन्न पुरवठा प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि ग्राहककेंद्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. 

Ration card updates will now be available on mobile as well, Lets know! | रेशनकार्डचे अपडेट्स आता मोबाईलवरही मिळणार; इंटरनेट नसले तरी नो टेन्शन, जाणून घ्या!

रेशनकार्डचे अपडेट्स आता मोबाईलवरही मिळणार; इंटरनेट नसले तरी नो टेन्शन, जाणून घ्या!

Next

रेशनकार्डशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स आता एसएमएसद्वारेही मिळणार आहेत. ग्राहकसेवेत सुलभता आणण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधित ग्राहकांचा मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.

इंटरनेट नसले तरी नो टेन्शन-

‘वन नेशन, वन रेशन’मोहिमेंतर्गत अन्न पुरवठा प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि ग्राहककेंद्री करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. संकेतस्थळ आणि मेरा रेशनकार्ड ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्राहकांना नेटवर्क अभावी आणि शहरी भागातील काही ग्राहकांना इंटरनेट हाताळता येत नसल्याने ऑनलाइन माहिती मिळवणे त्रासदायक ठरत आहे. ही समस्या लक्षात घेऊन रेशनकार्डशी संबंधित महत्त्वाच्या अपडेट्स एसएमएसद्वारे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांचा मोबाईल क्रमांक रेशनकार्डशी संलग्न नसेल, त्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रेशनकार्ड मोबाईलशी कसे जोडणार?

  1. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून, घरबसल्या करता येईल. त्यासाठी https://nfsa.gov.in/State/MH या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. 
  2. तेथे ‘अपडेट युवर रजिस्टर मोबाईल नंबर’ असा पर्याय दिसेल. त्याखाली चार बॉक्स पाहायला मिळतील. ‘आधारकार्ड नंबर ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड/एनएफएस आयडी’ या पहिल्या बॉक्समध्ये कुटुंबप्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. 
  3. पुढच्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर लिहा. तिसऱ्या बॉक्समध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव नमूद करून सर्वात शेवटच्या बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाका. 
  4. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल.

Web Title: Ration card updates will now be available on mobile as well, Lets know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.