रतन टाटांकडून भारताच्या हवाई दलाचं कौतुक; मोदींबद्दल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 11:22 PM2019-02-27T23:22:32+5:302019-02-27T23:23:46+5:30

रतन टाटांनी ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींना टॅग केलं आहे

ratan tata congratulate pm modi and indian air force for the successful air strike | रतन टाटांकडून भारताच्या हवाई दलाचं कौतुक; मोदींबद्दल म्हणाले...

रतन टाटांकडून भारताच्या हवाई दलाचं कौतुक; मोदींबद्दल म्हणाले...

Next

मुंबई: नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातीलदहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या धाडसाचं टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी कौतुक केलं आहे. मंगळवारी मध्यरात्री हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोठीमधील दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ले केले. या कारवाईबद्दल रतन टाटांनी हवाई दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं. या धाडसी कारवाईचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं टाटा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये मोदींच्या ट्विटर हँडलला टॅगदेखील केलं आहे. 

'पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या यशस्वी एअर स्ट्राइकबद्दल आम्ही पंतप्रधान आणि भारतीय हवाई दलाचं अभिनंदन करतो. आमच्या जमिनीवर दहशतवाद्यांचे तळ नाहीत, असं पाकिस्तान कायम सांगायचा. संपूर्ण देशाला या कारवाईचा अभिमान वाटतो,' असं ट्विट रतन टाटांनी केलं आहे. या ट्विटमध्ये टाटा यांनी मोदींच्या ट्विटर हँडलला टॅग केलं आहे. मोदींचे हे ट्विट 18 हजारांहून अधिक जणांनी रिट्विट केलं आहे. तर तब्बल 90 हजाराहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. 




भारतीय हवाई दलानं काल मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवादी तळांवर बॉम्ब हल्ले केले. जैश ए मोहम्मदचा मुख्य तळ असलेल्या बालाकोटवर हवाई दलानं बॉम्ब टाकले. याशिवाय मुझफ्फराबाद आणि चकोठीमधील दहशतवादी तळदेखील उद्ध्वस्त करण्यात आले. हवाई दलानं जवळपास 1000 किलोंचे बॉम्ब दहशतवादी तळांवर टाकले. 12 मिराज 2000 विमानांनी ही धाडसी कारवाई केली. विशेष म्हणजे अवघ्या 21 मिनिटांमध्ये भारतानं ही कारवाई फत्ते केली. यावेळी पाकिस्ताननं प्रतिकाराचा प्रयत्नदेखील झाला नाही. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली.

Web Title: ratan tata congratulate pm modi and indian air force for the successful air strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.