शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

वर्षातून तीन वेळा बहर येणाऱ्या दुर्मिळ आंब्याला देणार ‘भारत’ नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 13:02 IST

स्थानिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय असलेले हे झाड संपूर्ण केरळात एकमेवाद्वितीय आहे. या जातीचे झाड अन्यत्र कोठेही नाही.

ठळक मुद्दे‘फेसबुक कम्युनिटी’चे शोधकार्य : केरळात राज्यभर करणार प्रचार-प्रसार 

थ्रिसूर : वर्षातून तीन वेळा बहर येणाऱ्या आंब्याचा शोध केरळातीलआंबाप्रेमींनी लावला असून, या आंब्याचे 'भारत आंबा' असे नामकरण करण्यात येणार आहे. एका 'फेसबुक कम्युनिटी'च्या सदस्यांना केरळातील थ्रिसूरपासून जवळ असलेल्या मुंदूर येथे रस्त्याच्या कडेला हे झाड आढळून आले. त्याचे जतन व्हावे, तसेच प्रसार व्हावा, यासाठी कम्युनिटी सदस्यांनी पुढाकार घेतला. आता या आंब्याचे रीतसर 'भारत आंबा' असे नामकरण करण्यात येणार आहे. 

स्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, हा आंबा शोधणारी 'फेसबुक कम्युनिटी' केवळ आंब्यावरच काम करते. कम्युनिटी सदस्य आठवड्यातून एकदा आंब्यांच्या दुर्मिळ आणि गुणवंत झाडांच्या शोधात बाहेर पडतात. अशाच एका दौऱ्यात त्यांना 'भारत आंबा' सापडला. हे झाड दर चार महिन्यांनी फुलते. हे कळाल्यानंतर कम्युनिटी सदस्यांनी पुढील सर्व बहर व्यापाऱ्याला सांगून आधीच बुक करून घेतला. या आंब्याच्या कोयी गोळा करून केरळातील विविध ठिकाणी लावण्याची त्यांची योजना आहे.या 'फेसबुक कम्युनिटी'मध्ये २0 हजार सदस्य असून, जिल्हापातळीवर त्यांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपही आहेत. दरवर्षी देशी आंब्याची ५0 हजार रोपे लावण्याचा त्यांचा संकल्प आहे. शाळांना दरवर्षी १४ हजार आंबा रोपेही ते वितरित करतात.

डॉ. रेजी जॉर्ज हे या कम्युनिटीचे एक सदस्य आहेत. थ्रिसूर येथील ज्युबिली मिशन हॉस्पिटलमध्ये रेडिओ डायग्नोसिस विभागात ते काम करतात. त्यांनी आपल्या घराच्या छतावर २ हजार आंबा रोपे तयार केली आहेत. ही रोपे ते लोकांना वितरित करतात. कम्युनिटी सदस्यांनी सांगितले की, नव्याने शोध लागलेला आंबा चवीला प्रियूर आणि मुवांदन या स्थानिक प्रजातीच्या आंब्यांच्या एकत्रित चवीसारखा लागतो. त्याचे फळ साधारणत: ३00 ग्रॅम वजनाचे आहे.

................................................................

दुर्मिळ आंबा नष्ट होण्यापासून वाचवलाकेरळातील पलक्कड जिल्ह्यातील कोलेनगोडे येथील देशी आंब्याचे एक अत्यंत दुर्मिळ झाड ‘नादन मवुकल’ या आंबाप्रेमी समूहाने वाचविले आहे. पोनस असे या आंब्याचे नाव असून केरळी भाषेत पोनसचा अर्थ होतो ‘प्रिय’. स्थानिक पातळीवर अत्यंत लोकप्रिय असलेले हे झाड संपूर्ण केरळात एकमेवाद्वितीय आहे.  या जातीचे झाड अन्यत्र कोठेही नाही. त्याचा ज्ञात इतिहास ४० वर्षांचा आहे. सजन एस यांच्या घराच्या आवारात हे झाड आहे. 

टॅग्स :KeralaकेरळMangoआंबाFacebookफेसबुकenvironmentपर्यावरण