बलात्कारी नराधमाला जमावाने भरचौकात फासावर लटकवले

By Admin | Updated: March 6, 2015 10:06 IST2015-03-06T09:58:34+5:302015-03-06T10:06:07+5:30

नागालँडमध्ये तरुणीवर बलात्कार करणा-या नराधमाला संतप्त जमावाने तुरुंगातून बाहेर काढून भरचौकात फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना घडली.

The rapists hanged in a crowd on the fort | बलात्कारी नराधमाला जमावाने भरचौकात फासावर लटकवले

बलात्कारी नराधमाला जमावाने भरचौकात फासावर लटकवले

ऑनलाइन लोकमत 

कोहीमा, दि. ६ - नागालँडमध्ये तरुणीवर बलात्कार करणा-या  नराधमाला संतप्त जमावाने तुरुंगातून बाहेर काढून भरचौकात फासावर लटकवल्याची धक्कादायक घटना घडली.

दिमापूर येथे २३ फेब्रुवारी रोजी कॉलेमध्ये शिकणा-या तरुणीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केला होता. पिडीत तरुणीने याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी बलात्कारी नराधमाला अटकही केली होती. सध्या तो आरोपी दिमापूरमधील मध्यवर्ती कारागृहात होता. या बलात्कार प्रकरणाविरोधात दिमापूरमध्ये संतापाचे वातावरण होते. गुरुवारी सकाळी विद्यार्थी संघटना व स्थानिकांनी दिमापूरमध्ये मोर्च्याचे आयोजन केले. मात्र मोर्च्या दरम्यान हा जमाव हिंसक झाला व त्यांनी थेट मध्यवर्ती तुरुंगाच्या दिशेने कूच केले. संतप्त जमावाने आरोपीला फरफटत तुरुंगातून बाहेर काढले. यानंतर त्याला विवस्त्र करुन त्याला अमानूष मारहाण करण्यात आली. यानंतर दिमापूर शहरात सुमारे ७ किलोमीटरपर्यंत त्याची नग्नावस्थेतच धिंडही काढण्यात आली. मारहाणी दरम्यान आरोपीचा मृत्यू झाला असला तरी जमावाचा राग शांत झाला नाही. जमावाने नराधमाच्या मृतदेहाला भर चौकात लटकवून दिले. स्थानिक पोलिस व सीआरपीएफही या अमानूष प्रकाराला रोखू शकले नाही. पोलिसांनी अश्रूधूराचा वापर करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांकडून आदेश न मिळाल्याने स्थानिक सुरक्षा जमावावर समोर हतबल झाल्याचे समजते. 

काय होती घटना ?

दिमापूर येथे राहणा-या महाविद्यालयीन तरुणीला शहरातील ३५ वर्षीय तरुणाने नोकरीच्या बहाण्याने भेटायला बोलवले. या तरुणाचा शहरात सेकंड हँड बाईक खरेदी - विक्रीचा व्यवसाय आहे. भेटायला आल्यावर नराधमाने त्या तरुणीला थंडपेयातून गुंगीचे औषध दिले व तिला हॉटेलमधून नेऊन बलात्कार केला. संबंधीत तरुण हा बांग्लादेशी असून पिडीत तरुणी ही मुळची नागालँडची आहे. त्यामुळे या घटनेविरोधात स्थानिकांमध्ये संताप आहे. घटना उघड झाल्यावर नागालँडमध्ये बांग्लादेशमधून आलेल्या ग्रामस्थांवर दगडफेकही झाल्याचे समोर आले होते. 

Web Title: The rapists hanged in a crowd on the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.