शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फुटपाथवर सर्वांसमोर होत राहिला एका महिलेवर बलात्कार, लोकांनी मदत करण्याऐवजी काढले व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 09:01 IST

दारुच्या नशेत असणारा एक व्यक्ती फूटपाथवर महिलेवर बलात्कार करत असतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. महिलेवर बलात्कार होत असताना लोक मात्र मदत करण्याऐवजी तिथे उभं राहून नुसतं पाहत होते.

ठळक मुद्दे दारुच्या नशेत असणारा एक व्यक्ती फूटपाथवर महिलेवर बलात्कार करत असतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहेमहिलेवर बलात्कार होत असताना लोक मात्र मदत करण्याऐवजी तिथे उभं राहून नुसतं पाहत होतेही संपुर्ण घटना एक रिक्षाचालकाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केली, आणि नंतर पोलिसांना कळवलंपोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

विशाखापट्टणम - दारुच्या नशेत असणारा एक व्यक्ती फूटपाथवर महिलेवर बलात्कार करत असतानाचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. महिलेवर बलात्कार होत असताना लोक मात्र मदत करण्याऐवजी तिथे उभं राहून नुसतं पाहत होते. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम येथे घडली आहे. महिलेवर बलात्कार करणा-या आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव शिवा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी शिवा ट्रक ड्रायव्हर असून, बलात्कार केला तेव्हा तो दारुच्या नशेत होता. ही संपुर्ण घटना एक रिक्षाचालकाने आपल्या मोबाइलमध्ये कैद केली, आणि नंतर पोलिसांना कळवलं. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 22 ऑक्टोबरची आहे. रेल्वे न्यू कॉलनी आणि रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी दोन वाजताच्या दरम्यान हा बलात्कार झाल्याचं सांगितलं जात आहे. 

पोलीस निरीक्षक जी व्ही रमन यांनी आरोपी शिवाला अटक केल्याची माहिती दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'महिलेचं आपल्या पतीसोबत भांडण झालं असल्या कारणाने ती घराबाहेर पडली होती. फुटपाथवर महिला एकटी असल्याची संधी साधत आरोपी शिवाने तिच्यावर हल्ला केला. आरोपीला दारु आणि अंमली पदार्थांच्या आहारी गेला आहे. घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये बलात्कार होत असताना लोक तेथून जाताना दिसत आहेत. पण पीडित महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे येताना दिसत नाहीये. पीडित महिलेचा पती एक कामगार आहे. दोघांमध्ये सकाळी भांडण झालं होतं. सध्या पीडित महिलेला उपचारासाठी केजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.' 

दुसरीकडे पोलीस अधिका-यांचा दावा आहे की, 'घटनेची माहिती मिळताच पीसीआर तात्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. पण तोपर्यंत आरोपी फरार झाला होता'.

घटनेचा व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अशाप्रकारे आपल्या डोळ्यांसमोर एक व्यक्ती महिलेवर बलात्कार करत असताना एकाही व्यक्तीने पुढे येऊन मदत करण्याचं धाडस दाखवलं नसल्याचं पोलिसांना आश्चर्य वाटत आहे. पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं आहे की, 'आपलं कुटुंब आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेलं आहे. पतीसोबत भांडण झाल्यावर कुठे जाऊ हे कळत नव्हतं. म्हणूनच मग मी फुटपाथवर आराम करत होती, तेव्हा आरोपीने माझ्यावर हल्ला केला'. पोलिसांनी आरोपी शिवाला अटक केली आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिस