बलात्कारपीडित ननला आमदाराने म्हटले वेश्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 05:31 IST2018-09-10T05:31:16+5:302018-09-10T05:31:18+5:30
जालंधर प्रांताचे बिशप फ्रँको मुलक्कल यांनी अनेकवार बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ४४ वर्षीय ननला न्याय मिळावा म्हणून तिच्या सहकारी असलेल्या पाच नननी केरळ उच्च न्यायालयासमोर शनिवारी धरणे धरले.

बलात्कारपीडित ननला आमदाराने म्हटले वेश्या
कोची : जालंधर प्रांताचे बिशप फ्रँको मुलक्कल यांनी अनेकवार बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ४४ वर्षीय ननला न्याय मिळावा म्हणून तिच्या सहकारी असलेल्या पाच नननी केरळ उच्च न्यायालयासमोर शनिवारी धरणे धरले. नेमके त्याच दिवशी बलात्कारपिडित ननची ‘वेश्या’ अशी संभावना करुन आमदार पी. सी. जॉर्ज यांनी आपली पातळी दाखवून दिली. त्यामुळे ही नन दु:खावेगाने अनेक तास रडत होती.