बलात्काराचे सत्र उत्तर प्रदेशात सुरूच
By Admin | Updated: June 6, 2014 22:28 IST2014-06-06T22:28:53+5:302014-06-06T22:28:53+5:30
एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेसह दोन दिवसांत बलात्काराच्या चार घटनांची नोंद उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी करण्यात आली.

बलात्काराचे सत्र उत्तर प्रदेशात सुरूच
>मुजफ्फरनगर/महाराजगंज/ इटावा : एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेसह दोन दिवसांत बलात्काराच्या चार घटनांची नोंद उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी करण्यात आली.
बलात्काराच्या या पीडितांमध्ये दोन बहिणींसह तीन किशोरवयीन मुली असून एक सहा वर्षाची मुलगी आहे. फिरोजाबादमधील या बालिकेवर तिच्या शेजारी राहणा:या उमेश नावाच्या युवकाने ती घरासमोर खेळत असताना तिला एकांतात घेऊन जाऊन बलात्कार केला. ही मुलगी जेव्हा घरी पोहचली तेव्हा तिच्या कुटुंबीयांना घडलेला प्रकार कळला. या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. अन्य एका घटनेत इटावा येथे दोन किशोरवयीन बहिणींवर तीन इसमांनी सामूहिक बलात्कार केला. त्या तिघांना अटक झाली असून पुढील तपास सुरू आहे. या दोघी बहिणी काम संपवून घरी परतत असताना राजपाल, महिपाल व संजय या तिघांनी त्यांच्यावर बलात्कार केला.
महाराजगंज येथे घडलेल्या अन्य एका घटनेत एका किशोरवयीन मुलीवर तिच्या शेजा:याने बलात्कार केला. 13 वर्षाची ही मुलगी घरात एकटी असताना मजहर नावाच्या 2क् वर्षाच्या तरुणाने तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (वृत्तसंस्था)