लोकसंख्येच्या तुलनेत बलात्कार कमीच - मुलायम
By Admin | Updated: July 20, 2014 01:02 IST2014-07-20T01:02:51+5:302014-07-20T01:02:51+5:30
उत्तर प्रदेशची लोकसंख्या 21 कोटी आह़े त्या तुलनेत येथे होणा:या बलात्कारांची संख्या फारच कमी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या सरकारचा बचाव केला आह़े

लोकसंख्येच्या तुलनेत बलात्कार कमीच - मुलायम
नवी दिल्ली/ लखनौ : बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या सरकारवर चहूबाजूंनी टीका होत असताना, सत्ताधारी पक्षाचे सव्रेसर्वा मुलायमसिंग यादव यांनी मात्र आपल्या सरकारचा बचाव करण्याचे केविलवाणो प्रयत्न चालवले आहेत़ उत्तर प्रदेशची लोकसंख्या 21 कोटी आह़े त्या तुलनेत येथे होणा:या बलात्कारांची संख्या फारच कमी आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या सरकारचा बचाव केला आह़े
शुक्रवारी रात्री लखनौच्या मोहनलालगंज भागात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आह़े या पाश्र्वभूमीवर आज शनिवारी दिल्लीत पत्रकारांनी मुलायमसिंग यांना छेडले असता त्यांनी हे विधान केल़े
तुम्ही उत्तर प्रदेशाबद्दल बोलत आहात़ उत्तर प्रदेशची लोकसंख्या 21 कोटी आह़े देशात सर्वाधिक कमी बलात्काराची प्रकरणो कुठे घडत असतील तर ती उत्तर प्रदेशात, असे ते म्हणाल़े यापूर्वीही बलात्कारांसारख्या चुका तरुण पोरांकडून होतच असतात, असे वादग्रस्त वक्तव्य मुलायमसिंग यांनी केले होत़े
विरोधकांची तीव्र टीका
लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशातील फार कमी बलात्कार होत असल्याच्या मुलायमसिंग यादव यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली़ या वक्तव्यावरून सपा सरकार किती असंवेदनशील आहे ते दिसते, असा सूर विरोधकांच्या टीकेतून उमटला़ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मुलायमसिंगांचे हे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे म्हटल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्मुलायमसिंग यांचे वक्तव्य बलात्का:यांना प्रात्साहन देणारे आह़े त्याचमुळे केवळ सपा सरकारच्या कार्यकाळातच अशा घटना घडत आहेत़ या वक्तव्याने त्यांचे सरकार किती असंवेदनशील आहे, ते स्पष्ट झाल्याचे उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष निर्मल शास्त्री यांनी सांगितले. बलात्काराची एक घटनाही लाजिरवाणी आह़े असे असताना राज्यात जणू काही एकही घटना घडली नाही, असे भासवण्याचा खटाटोप सपा सरकार करीत आह़े यामुळे देशात चुकीचा संदेश जाईल, असे काँग्रेस नेते रशीद अल्वी म्हणाले.
च्उत्तर प्रदेशच्या नेत्यांनी वृत्तपत्रे वाचावीत म्हणजे राज्यात बलात्काराच्या किती घटना घडत आहेत, ते त्यांना कळेल, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या शमीना शफीक म्हणाल्या. तर लोकसंख्येचे मापदंड गुन्ह्यांसाठीच का? अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशचा अधिक विकास व्हावा, विविध क्षेत्रत राज्याने अग्रेसर राहावे, यासाठीही लोकसंख्येचे मापदंड लावायला हवेत, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेश भाजपाचे प्रवक्ता विजय बहादूर पाठक यांनी दिली.
च्हे बेजबाबदार वक्तव्य म्हणजे बलात्कार आणि हत्येच्या घटना सपा सरकार किती असंवेदनशीलपणो घेतात, याचा हा नमुना आहे, असे मत बसपा नेते आऱ क़े चौधरी यांनी व्यक्त केले.