बलात्कारी धर्मगुरूची केली हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 06:41 IST2020-03-02T06:40:53+5:302020-03-02T06:41:18+5:30

एका १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याबद्दल सध्या तुरुंगात असलेले येथील सिरो मलबार चर्चचे धर्मगुरू फादर रॉबिन वडाक्कुनचेरी यांची पोप फ्रान्सिस यांनी चर्चमधून हकालपट्टी केली आहे.

Rape cleric dismissed | बलात्कारी धर्मगुरूची केली हकालपट्टी

बलात्कारी धर्मगुरूची केली हकालपट्टी

कोची : एका १६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिला गरोदर केल्याबद्दल सध्या तुरुंगात असलेले येथील सिरो मलबार चर्चचे धर्मगुरू फादर रॉबिन वडाक्कुनचेरी यांची पोप फ्रान्सिस यांनी चर्चमधून हकालपट्टी केली आहे.
‘पॉक्सो’ विशेष न्यायालयाने वडाक्कुनचेरी यांना २० वर्षे सक्तमजुरी व तीन लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सन २०१७ मध्ये त्यांनी केलेला बलात्काराचा गुन्हा उघड होताच त्यांना चर्चमधून निलंबित करण्यात आले होते. बालकांचे शोषण करणाऱ्या चर्चमधील अधिकाऱ्यांना जराही दया न दाखविण्याच्या धोरणानुसार फादर वडाक्कुनचेरी यांच्याकडून धर्मगुरूचे सर्व अधिकार काढून घेण्यात आली.

Web Title: Rape cleric dismissed