बलात्कार प्रकरण
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:12+5:302015-06-25T23:51:12+5:30
सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार

बलात्कार प्रकरण
स ा वर्षीय बालिकेवर बलात्कारनरामधमास सात वर्षे कारावासकन्हानच्या मंगल कार्यालयातील घटनानागपूर : कन्हानच्या रॉयनगर येथील कुलदीप मंगल कार्यालयात एका सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमाला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. राठी यांच्या न्यायालयाने ७ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. राकेश ऊर्फ चक्रधर जागोजी बेले (२७) असे आरोपीचे नाव असून तो टेकाडी येथील रहिवासी आहे. ही घटना ३ मे २०१३ रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली होती. ही दुर्दैवी बालिका आई आणि चुलत भावासह नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. सकाळी ११-११.३० वाजताच्या दरम्यान लग्नसोहळा पार पडला होता. त्यानंतर तिची आई नातेवाईकांसोबत बोलत बसली होती, तर ही बालिका तिच्याच बाजूला खेळत होती. ती १२.३० वाजताच्या सुमारास आईकडे आली आणि त्यानंतर अचानक बेपत्ता होती. १५ मिनिटे झाले तरी मुलगी दिसली नाही म्हणून आईने तिचा शोध घेतला असता ती मंगल कार्यालयाच्या वरच्या माळ्यावरून रडत येताना दिसली. घटनेच्या वेळी हा नराधम अनोळखी होता. त्याने या बालिकेला आईस्क्रीम खाऊ घालण्याचे आमिष दाखवून मंगल कार्यालयाच्या वरच्या माळ्यावर नेले होते. या ठिकाणी बलात्कार करून तो पसार झाला होता. पीडित बालिकेने घडलेली घटना आपल्या आईला सांगताच संपूर्ण लग्न समारंभातच मोठी खळबळ उडाली होती. लागलीच या घटनेची तक्रार कन्हान पोलिसांकडे नोंदवण्यात आली होती. त्यावरून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपूर्ण --