शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराचा विरोध करणा-या 60 वर्षीय महिलेची हत्या, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:37 IST

राजस्थानमध्ये एका  60 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या हत्येमागे शेजारीच राहणा-या तरुणाचा हात असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, या तरुणाने महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये एका  60 वर्षीय महिलेची हत्या बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आरोपीकडून महिलेची हत्यापोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे

जयपूर - राजस्थानमध्ये एका  60 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या हत्येमागे शेजारीच राहणा-या तरुणाचा हात असल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक म्हणजे, या तरुणाने महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला होता. मात्र बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याने महिलेची हत्या केली. पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. 

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, केळवाडा पोलीस ठाण्याचे एसएचओ विजेंद्र सिंह यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं की, रविवारी सलेडी गावातील घऱात महिलेचा मृतदेह आढळला होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आला होता. पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एसएचओ विजेंद्र सिंह यांनी सांगितलं की, 'महिलेच्या हत्येच्या आरोपाखाली सूरजमल अहदी उर्प सुरजा याला सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केलं जाईल'. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असल्याचं विजेंद्र सिंह यांनी सांगितंल आहे. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, 'गुरुवारी रात्री 11 वाजता महिला घरात एकटी असताना सूरजमल तिथे पोहोचला. यावेळी आरोपीने महिलेसोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण महिलेने विरोध करत सूरजमलला घराबाहेर हाकलण्यास सुरुवात केली. आरोपीने अचानक जवळ पडलेलं एक लाकूड उचललं आणि महिलेच्या डोक्यावर वार केला'.

डोक्यावर वार झाल्यानं महिला बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडली. आरोपीला महिला शुद्धीत आल्यानंतर सर्वांना घटनेबद्दल सांगेल, ज्यामुळे आपली बदनामी होईल अशी भीती वाटू लागल्याने त्याने दगडाने महिलेचं डोकं ठेचलं आणि हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर ते फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला विधवा असून घरात एकटी राहत होती. त्यांची तिन्ही मुलं कामानिमित्त गावाबाहेर असतात. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.  

टॅग्स :MurderखूनRapeबलात्कार