आईसोबत बलात्कार अन् मुलीबरोबर जबरदस्ती करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला चोप, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 12:55 IST2019-09-28T12:55:18+5:302019-09-28T12:55:24+5:30

विवाहितेवर बलात्कार आणि तिच्या मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या भाजयुमो नगर मंडल हनुमानगडचे माजी अध्यक्ष विकास नागपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

rape accused man beaten at road side by victim in hanumangarh video goes viral | आईसोबत बलात्कार अन् मुलीबरोबर जबरदस्ती करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला चोप, व्हिडीओ व्हायरल

आईसोबत बलात्कार अन् मुलीबरोबर जबरदस्ती करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला चोप, व्हिडीओ व्हायरल

हनुमानगडः लग्नाचं आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार आणि तिच्या मुलीबरोबर अश्लील चाळे करणाऱ्या भाजयुमो नगर मंडल हनुमानगडचे माजी अध्यक्ष विकास नागपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बलात्काराचा आरोप लावणारी महिला विकास नागपालची धुलाई करताना पाहायला मिळतेय. पीडितेबरोबरचा नागपाल आणि त्याच्या पत्नीसोबतच्या मारहाणीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरत चालला आहे. भाजयुमोचे माजी अध्यक्ष विकास नागपाल याच्यावर महिलेला फसवल्याचा गुन्हा आधीच नोंद आहे.

 विवाहितेचा बलात्कार आणि पीडितेच्या मुलीचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विकास नागपालला याच वर्षी मेमध्ये पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयानं त्यांना तुरुंगातही धाडलं होतं. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला आहे. पीडितेनं पोलिसांना सांगितलं की, 15 वर्षांपूर्वी पीडितेचं लग्न झालेलं होतं. त्यावेळी पीडितेचा पती आणि विकास नागपाल हे मित्र होते.

पतीपासून पीडितेला एक मुलगा आणि मुलगी झाली. परंतु कालांतरानं विकास नागपालनं पती आणि पीडितेमध्ये वादाची परिस्थिती निर्माण केली आणि त्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिलं. परंतु काही केल्या त्यानं लग्न केलं नाही. लग्नाचं आमिष दाखवून तो तिच्यावर बलात्कार करत राहिला. त्यानंतर त्यानं तिच्या मुलीचंही लैंगिक शोषण केलं आहे.  

Web Title: rape accused man beaten at road side by victim in hanumangarh video goes viral