रणजी मोसम 7 डिसेंबरपासून
By Admin | Updated: August 10, 2014 02:54 IST2014-08-10T02:54:57+5:302014-08-10T02:54:57+5:30
आगामी रणजी करंडक क्रिकेट मोसमाचा प्रारंभ 7 डिसेंबरपासून होणार आहे. 12 मार्च 2क्15 रोजी स्पर्धेचा समारोप होईल.

रणजी मोसम 7 डिसेंबरपासून
>नवी दिल्ली : आगामी रणजी करंडक क्रिकेट मोसमाचा प्रारंभ 7 डिसेंबरपासून होणार आहे. 12 मार्च 2क्15 रोजी स्पर्धेचा समारोप होईल. त्याआधी 15 ऑक्टोबरपासून दुलिप करंडक सामन्यांना सुरुवात करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या स्पर्धा आयोजन समितीने घेतला.
पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने वन-डे विश्वचषक स्पर्धेचे आयोजन होणार आहे. त्यापूर्वी बीसीसीआयने 7 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय वन-डे स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. विजय हजारे करंडक स्पर्धा याच कालावधीत 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान खेळविण्यात येईल. (वृत्तसंस्था)
‘अ’ गटात गत चॅम्पियन कर्नाटक, 4क् वेळा चॅम्पियन राहिलेला मुंबई संघ उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू, बंगाल, रेल्वे, बडोदा, जम्मू काश्मीर, आणि मध्य प्रदेश यांचा तर ‘ब’ गटात महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, विदर्भ, हरियाणा आणि ओडिशा.
देवधर चषक आंतर झोनल
वन-डे स्पर्धा
29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर
रणजी करंडक साखळी सामने
7 डिसेंबर ते 8 फेब्रुवारी
उपांत्यपूर्व लढती
15 ते 19 फेब्रुवारी
सेमीफायनल
25 फेब्रुवारी ते 1 मार्च
फायनल
8 ते 12 मार्च
इराणी करंडक
17 ते 21 मार्च
सय्यद मुश्ताक अली
टी-2क् चॅम्पियनशिप
25 ते 28 मार्च
अंतिम फेरी
1 ते 7 एप्रिल
4‘क’ गटात
गोवा, हिमाचाल प्रदेश, केरळ, हैदराबाद,
आंध्र, आसाम, त्रिपूरा, झारखंड
आणि सेनादल या संघाचा समावेश आहे