रानी-की-वाव, ग्रेट हिमालयन पार्क जागतिक वारसा घोषित होणार

By Admin | Updated: June 20, 2014 02:51 IST2014-06-20T02:51:42+5:302014-06-20T02:51:42+5:30

गुजरातची प्राचीन ‘रानी की वाव’ (पाय:यांची विहिर) आणि हिमालय प्रदेशातील ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होणो जवळपास निश्चित मानले जात आह़े

Rani-Ki-Wav, Great Himalayan Park will be declared World Heritage | रानी-की-वाव, ग्रेट हिमालयन पार्क जागतिक वारसा घोषित होणार

रानी-की-वाव, ग्रेट हिमालयन पार्क जागतिक वारसा घोषित होणार

>नवी दिल्ली : गुजरातची प्राचीन ‘रानी की वाव’ (पाय:यांची विहिर) आणि हिमालय प्रदेशातील ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट होणो जवळपास निश्चित मानले जात आह़े        भारतीय पुरातत्व सव्रेक्षण (एएसआय)च्या सूत्रंनी गुरुवारी ही माहिती दिली़ 
11 व्या शतकात साकारलेली ‘रानी-की-वाव’ आणि ‘गेट्र हिमालयन नॅशनल पार्क’ला उद्या शुक्रवारी कतारमध्ये आयोजित 38 व्या जागतिक वारसा सत्रदरम्यान अनुक्रमे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा स्थळाच्या श्रेणीअंतर्गत जागतिक वारसा घोषित केले जाऊ शकत़े 
पाटनस्थित ‘रानी-की-वाव’ ही भूजल स्नेतांचा वापर आणि जलव्यवस्थापन प्रणालीचे एक अनोखे उदाहरण असल्याचे युनेस्कोने मान्य केले आह़े
अधिकृत सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक वारसा यादीत कुठल्याही स्थळाला सामील करणो म्हणजे त्याच्या महत्त्वपूर्ण सार्वभौम मूल्यांना मान्यता देणो होय़ 
यामुळे या दोन्ही स्थळांना आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या मानचित्रवर जागा मिळेल़ यामुळे या स्थळांना भेट देणा:या पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल़(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4‘रानी-की-वाव’ ही एक पाय:या असलेली प्राचीन विहीर आह़े रानी उदयमती हिने आपला पती व सोळंकी राजवंशाचा राजा भीमदेव पहिला याच्या स्मृतीत 1क्63 मध्ये ‘रानी-की-वाव’ नामक ही पाय:यांची विहीर बांधली होती़ साबरमती नदीला पूर आला आणि ही विहीर गाळाने बुजली़ 198क् च्या दशकात एएसआयने या ठिकाणी उत्खनन करून या विहिरीला पुनरुज्जीवित केल़े
 
हिमालयन नॅशनल पार्क
4ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्हय़ात आह़े 1999 मध्ये यास राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यात आल़े ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क आणि त्याच्या आजूबाजूचे पार्क 2,85क् चौ़ किमी क्षेत्रत वसलेले          आह़े

Web Title: Rani-Ki-Wav, Great Himalayan Park will be declared World Heritage