मराठा आरक्षणावरुन राणे पिता-पुत्रांचे राजकारण

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:20+5:302015-08-27T23:45:20+5:30

- रामदास आठवले यांचा आरोप

Rane's father-son politics on Maratha reservation | मराठा आरक्षणावरुन राणे पिता-पुत्रांचे राजकारण

मराठा आरक्षणावरुन राणे पिता-पुत्रांचे राजकारण

-
ामदास आठवले यांचा आरोप
मुंबई : गुजरातमधील पटेल समाजाच्या आंदोलनानंतर नारायण राणे व नीतेश राणे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देण्याची केलेली घोषणा निव्वळ राजकारण असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला.
गुजरातमध्ये पटेलांनी जोरदार आंदोमन छेडल्यानंतर महाराष्ट्रातही तसेच आंदोलन पेटविण्याची भाषा राणे पिता-पुत्रांनी केली. त्यांची ही भाषा केवळ राजकारणाचा भाग आहे. आरक्षणाच्या लढाईसाठी मराठा समाज एकत्र येण्याची शक्यता नाही, तो समाज राजकारणासाठी एकत्र येतो. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारण्याचे दावे करणा-यांनी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी लढणा-या हार्दिक पटेल यांच्याकडून व समाजाच्या एकीकडून काहीतरी शिकावे, असा टोला त्यांनी लगावला. हार्दिक पटेलला जितका पाठिंबा पटेल समाजातून मिळत आहे, तितका प्रतिसाद व पाठिंबा राणेंना मराठा समाजाकडून मिळण्याची शक्यता नाही, असे आठवले म्हणाले. कॉंग्रेस सरकारने निवडणूका समोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे नाटक केले, मात्र आरक्षण देण्याचा त्यांचा विचार नव्हता असा आरोप त्यांनी केला.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली. याबाबत विचारले असता आठवले म्हणाले की, मुंबई सेंट्रलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी रिपाइंने सर्वप्रथम व फार आधी केली आहे. त्यामुळे या स्थानकाला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला पक्षाचा विरोध आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला आंबेडकरांचेच नाव दिले जावे अन्य कोणाचेही नाव दिल्यास पक्षातर्फे रस्त्यावर उतरुन तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा आठवले यांनी दिला. वडाळा येथे नाना शंकरशेठ यांच्या स्मारकाचे काम सुरु करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांचे नाव वडाळा स्थानकाला दिले जावू शकते असे ते म्हणाले.

Web Title: Rane's father-son politics on Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.