शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Randeep Surjewala On BJP: 'केंद्राची नवीन स्कीम- बँकेला लुटा आणि पळून जा'; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 14:16 IST

Randeep Surjewala On BJP: सीबीआयने देशातील 28 बँकांची फसवणूक आणि 22 हजार 842 कोटींच्या रुपयांच्या बँकिंग घोटाळ्याप्रकरणी गुजरातमधील एबीजी शिपयार्ड आणि कंपनीचे तत्कालीन सीएमडी ऋषी अग्रवाल यांच्यासह आठजणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

नवी दिल्ली: एबीजी शिपयार्डच्या (ABG Shipyard) कथित बँक फसवणुकीवरुन काँग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला(Randeep Singh Surjewala) यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना या एबीजी शिपयार्ड प्रकरणाला 'लूटा आणि पळून जा' योजना असे नाव दिले आहे. 

रणदीप सुरजेवाला आज पत्रकार परिषद घेऊन एबीजी शिपयार्डचा 22,884 कोटी रुपयांचा घोटाळा मोदीजींच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संमतीने झाल्याचा आरोप केला. सुरजेवाला यांनी रविवारी ट्विट करुन मोदी सरकारला घेरले. ₹2,20,00,00,00,842 लोकांच्या पैशांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मोदी सरकारच्या काळात 75 वर्षात भारतातील सर्वात मोठी बँक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय, गेल्या 7 वर्षात ₹ 5,35,000 कोटींच्या 'बँक फ्रॉड'ने आपली 'बँकिंग सिस्टिम' उद्ध्वस्त केली, असेही ते म्हणाले.

'बँकांमधून पैसे गायब'सुरजेवाला यांनी या ट्विटसोबत विधानाची एक प्रतही शेअर केली आहे. या विधानानुसार, गेल्या सात वर्षांत बँकिंग उद्योगातून 5.35 लाख कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की काही लोकांचे 5 लाख 35 हजार कोटी रुपये बँकांमधून गायब झाले आहेत. याआधीही या प्रकरणी काँग्रेसने भाजपला घेरले होते.

आतापर्यंत 8 जणांना अटक सीबीआयने देशातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या 22 हजार 842 कोटींच्या रुपयांच्या बँकिंग घोटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. गुजरातमधील एबीजी शिपयार्ड आणि कंपनीचे तत्कालीन सीएमडी ऋषी अग्रवाल यांच्यासह आठजणांविरोधात सीबीआयने फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. कंपनीने 28 बँकांची फसवणूक केली असून, फरार उद्योगपती विजय मल्या व हिरे व्यावसायिक नीरव  मोदी यांनी केलेल्या फसवणुकीपेक्षाही हा घाटाळा मोठा आहे.

या बॅंकांना फटका एसबीआयची 2 हजार 468, आयसीआयसीआय बँकेची 7 हजार 89, आयडीबीआय बँकेची 3 हजार 634, बँक ऑफ बडोदाची 1 हजार 614, पंजाब नॅशनल बँकेची 1 हजार 244 आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची 1 हजार 228 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी