रामकुंडावर भाविकाची रोकड लंपास

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:04+5:302015-08-18T21:37:04+5:30

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त राजस्थानहून नाशिकला आलेल्या भाविकाचे रामकंुडावर स्नानादरम्यान पाकिट मारल्याची घटना सोमवारी (दि़१७) रोजी घडली आहे़ दरम्यान शहरात कडेकोट बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतानाही भाविकांच्या लुटीच्या घटना सुरू असल्यामुळे एकंदरीतच भीतीचे वातावरण आहे़

Ramkunda has a cash lump sum of Rs | रामकुंडावर भाविकाची रोकड लंपास

रामकुंडावर भाविकाची रोकड लंपास

शिक : सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त राजस्थानहून नाशिकला आलेल्या भाविकाचे रामकंुडावर स्नानादरम्यान पाकिट मारल्याची घटना सोमवारी (दि़१७) रोजी घडली आहे़ दरम्यान शहरात कडेकोट बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असतानाही भाविकांच्या लुटीच्या घटना सुरू असल्यामुळे एकंदरीतच भीतीचे वातावरण आहे़
चितोडगडहून तीर्थयात्रेसाठी नाशिकला आलेले सत्यनारायण शिवलहरी कोठारी (७९) हे सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रामकुंडावर स्नानासाठी आले होते़ मुलीला कपड्यांजवळ थांबवून ते रामकुंडात स्नानासाठी गेले असता चोरट्यांनी मुलीची नजर चुकवून त्यांच्या खिशातील पाकिट चोरून नेले़ पाकिटामध्ये १९ हजार पाचशे रुपये रोख होते़
या प्रकरणी कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Ramkunda has a cash lump sum of Rs