रामकृष्ण हेजीब यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 04:44 IST2017-08-14T04:44:49+5:302017-08-14T04:44:54+5:30

महाराष्टÑाचे दिल्लीतील सांस्कृतिक दूत अशी ओळख असणारे रामकृष्ण मोरेश्वर हेजीब यांचे शनिवारी सायंकाळी नवी दिल्लीत निधन झाले.

Ramkrishna Hejib dies | रामकृष्ण हेजीब यांचे निधन

रामकृष्ण हेजीब यांचे निधन


नवी दिल्ली : महाराष्टÑाचे दिल्लीतील सांस्कृतिक दूत अशी ओळख असणारे रामकृष्ण मोरेश्वर हेजीब यांचे शनिवारी सायंकाळी नवी दिल्लीत निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी नीना आणि मुलगी तनुजा असा परिवार आहे.
हेजीब हे महाराष्टÑ परिचय केंद्राचे माजी संचालक आणि दिल्ली सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष होते. मराठी संस्कृतीचे दिल्लीत जतन करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या वतीने मराठी नाट्य महोत्सव, चित्रपट महोत्सव आदींच्या आयोजनात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. निवृत्तीनंतरही त्यांनी सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून महाराष्टÑ दिन महोत्सव, गणेशोत्सव, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, कोजागरी पौर्णिमा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात हिरीरीने पुढाकार घेतला होता.

Web Title: Ramkrishna Hejib dies