शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

"जोधाबाई-अकबर यांच्यात प्रेम होतं का?, सत्तेसाठी मुलीला पणाला लावले"; भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 15:02 IST

BJP Rameshwar Sharma : रामेश्वर यांचे विधान सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शर्मा यांच्या या विधानानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्येभाजपा नेत्याच्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भोपाळमधील भाजपाचे आमदार रामेश्वर शर्मा (BJP Rameshwar Sharma) आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सागर जिल्ह्यात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हिंदुत्वावर भाषण देताना जोधा-अकबर यांचा प्रेमविवाह नव्हता. उलट सत्तेसाठी मुलीला पणाला लावले होते असे विधान रामेश्वर शर्मा यांनी केले आहे. रामेश्वर यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शर्मा यांच्या या विधानानंतर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

"जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात आणि सत्तेसाठी आपल्या मुलीला पणाला लावतात, तेव्हा अशा दरोडेखोरांपासून सावध राहा. जे तुमचे आहेत पण धर्माचा विश्वासघात करू शकतात" असंही म्हटलं आहे. तसेच रामेश्वर शर्मा यांनी "जोधाबाई-अकबर यांच्यात काही प्रेम होते का? हे दोघे कोणत्याही महाविद्यालयात भेटले का? ते कॉफी हाऊसमध्ये भेटले का? जीममध्ये भेटले? जेव्हा लोक सत्तेसाठी लोभी होतात तेव्हा सत्तेसाठी आपल्या मुलीला पणाला लावतात. तेव्हा अशा दरोडेखोरांपासून सावध रहा, जे तुमचे आहेत पण धर्माचा विश्वासघात करू शकतात" असं  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. 

रामेश्वर शर्मा यांनी निवेदन जारी करून मागितली माफी

रामेश्वर शर्मा यांच्या या वादग्रस्त विधानानंतर आता राजपूतांनी नाराजी व्यक्त केली आहे. रामेश्वरांच्या या विधानामुळे राजपूत समाज प्रचंड संतापला आहे. शर्मा यांच्या विधानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. याच दरम्यान नंतर वाढताना पाहून रामेश्वर शर्मा यांनी आता एक निवेदन जारी करून माफी मागितली आहे. जर आपल्या विधानामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करत आहे असे शर्मा यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"प्रभू राम हे फक्त हिंदूंचे, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत"

जम्मू -काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah ) यांनी भाजपा (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच शनिवारी बोलताना त्यांनी शेजारच्या देशांशी मैत्री करण्यावर भर दिला. कलम 370 रद्द केल्याबद्दल भाजपावर निशाणा साधला आहे. प्रभू श्रीराम हे फक्त हिंदूंचेच नसून संपूर्ण जगाचे असल्याचं म्हटलं. फारुख अब्दुल्ला यांनी "प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे राम नाहीत. ते पूर्ण जगाचे राम आहे. भाजपाने त्यांना स्वत:चे बनवले आहे, जणू प्रभू राम फक्त त्यांच्यासाठीच आहे आणि इतर कोणासाठीही नाही. प्रभू राम हे फक्त भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच नाही तर संपूर्ण जगाचे आहेत" असं म्हटलं आहे. 

 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणMadhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत