Success Story: MR म्हणून नोकरीला सुरुवात, गावो-गावी जाऊन औषध विकली; आज 60000 कोटींच्या कंपनीचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 06:43 PM2022-11-29T18:43:00+5:302022-11-29T18:43:42+5:30

डॉक्टरांना भेटण्यासाठी तासनतास थांबायचे, आज तेच डॉक्टर त्यांची औषधे रुग्णांना देतात.

Ramesh Juneje Success Story: Ramesh Juneje Started job as MR, sold medicine from village to village; Today owns a 60000 crore company | Success Story: MR म्हणून नोकरीला सुरुवात, गावो-गावी जाऊन औषध विकली; आज 60000 कोटींच्या कंपनीचे मालक

Success Story: MR म्हणून नोकरीला सुरुवात, गावो-गावी जाऊन औषध विकली; आज 60000 कोटींच्या कंपनीचे मालक

googlenewsNext

Success Story Ramesh Juneja: 'परीश्रम अशी चाबी आहे, ज्याने नशिबाचे दार सहज उघडता येते.' समर्पण, संयम आणि परिश्रम यांच्या जोरावर यश मिळवणे सहज शक्य आहे. मॅनकाइंड फार्माचे मालक रमेश जुनेजा हे याचेच एक उदाहरण आहेत. मेरठमध्ये राहणारे मॅनकाइंड फार्माचे मालक रमेश जुनेजा यांचे सुरुवातीचे आयुष्य सोपे नव्हते. पण आपली मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी हजारो कोटी रुपयांचा व्यवसाय सुरू केला. आज या कंपनीची औषधे देश-विदेशात विकली जातात.

1974 मध्ये एमआर म्हणून नोकरी सुरू
रमेश जुनेजा यांनी पदवीनंतर 1974 मध्ये वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून नोकरीला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला जुनेजा डॉक्टरांना भेटण्यासाठी मेरठ ते पुरकाजी असा यूपी रोडवेजच्या बसने प्रवास करत असे. काही वेळा डॉक्टरांना भेटण्यासाठी तासनतास थांबावे लागायचे. या व्यवसायात ते कष्ट करून हळूहळू पुढे जात राहिले. नी फार्मा कंपनीत 1975 पर्यंत (सुमारे एक वर्ष) काम केल्यानंतर रमेश यांनी 1975 मध्ये लुपिन फार्मामध्ये आठ वर्षे काम केले.

50 लाख रुपयांपासून झाली मॅनकाइंडची सुरुवात 
आठ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी एका भागीदारासह बेस्टोकेम नावाची कंपनी सुरू केली. 1994 मध्ये बेस्टोकेमशी संबंध तोडून त्यांनी 1995 मध्ये लहान भाऊ राजीव जुनेजासोबत 50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने मॅनकाइंड फार्मा सुरू केली. त्याच वर्षी मॅनकाइंड फार्मा ही 4 कोटी रुपयांची कंपनी बनली.

स्वस्त औषधांची कल्पना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेडिकल स्टोअरमध्ये उभे असताना त्यांनी पाहिले की, एक व्यक्ती औषध घेण्यासाठी आली होती आणि त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने औषध घेण्याऐवजी चांदीचे दागिने दिले. यानंतर रमेश जुनेजा यांनी औषधाच्या गुणवत्तेबरोबरच किंमतही कमी ठेवण्याचा विचार केला. याच कल्पनेतून त्यांनी मॅनकाइंड फार्मा सुरू केली. कंपनी सुरू केल्यानंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि त्यांच्या व्यवसायात नवीन गोष्टी जोडत राहिल्या.

फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत समावेश
रमेश जुनेजा यांचा नुकताच फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यांच्या कंपनीने कंडोम आणि गर्भनिरोधक उत्पादने जगासमोर आणली. 2007 मध्ये टीव्हीवर मॅनकाइंड कंडोमच्या जाहिराती सुरू झाल्या. त्यानंतर मॅनफोर्स ब्रँड लोकांच्या ओठांवर आला. याशिवाय ग्रामीण बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून त्यांनी बाजारात स्वस्तात औषधांचा पुरवठा केला. यासह त्यांच्या कंपनीने विक्री प्रमोशनवर खर्च करून वेगाने वाढ नोंदवली. आज त्यांची कंपनी 60000 कोटींची झाली आहे.

Web Title: Ramesh Juneje Success Story: Ramesh Juneje Started job as MR, sold medicine from village to village; Today owns a 60000 crore company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.