Ramdas Athawale: त्रिपुरात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास भाजपला पाठिंबा देतील: रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:38 IST2023-02-13T16:37:37+5:302023-02-13T16:38:19+5:30
Ramdas Athawale: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आगरतळा येथे आयोजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते.

Ramdas Athawale: त्रिपुरात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास भाजपला पाठिंबा देतील: रामदास आठवले
आगरतळा:त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे ४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून ५६ जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा आहे. ४ जागांवर भाजपशी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मैत्रीपूर्ण लढत देत असून या निवडणुकीत रिपाइंचे उमेदवार जिंकून आल्यास रिपाइं उमेदवारांचा सत्ता स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा असेल अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली.
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आगरतळा येथे आयोजित जाहीर सभेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर रिपाइंचे त्रिपुरा राज्य अध्यक्ष सत्यजित दास आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेपूर्वी आगरतळा येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपाइंचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री नारामदास आठवले यांनी आगरतळामध्ये रिपाइंच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ केलेल्या रोड शो आणि पदयात्रेला येथील स्थानिक जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन रामदास आठवले यांचे विविध ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"