शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; हिंदू महासभेच्या नेत्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 10:28 IST

स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

बिहारमधून सुरू झालेला रामचरितमानसचा वाद आता उत्तर प्रदेशात पोहोचला आहे. समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसच्या चौपाईला भेदभाव करणारी असल्याचे म्हणत त्यावर बंदी घालण्याची मागणी केलीआहे. यानंतर हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानसमधील काही श्लोक कथितपणे भेदभाव करणारे म्हटल्यानंतर एक दिवसानंतर अखिल भारत हिंदू महासभेच्या एका नेत्याने त्यांची जीभ कापून टाकणाऱ्याला 51,000  रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

"जर एखाद्या व्यक्तीने समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापली तर त्याला बक्षीस म्हणून 51,000 रुपयांचा धनादेश दिला जाईल. त्यांनी आमच्या धार्मिक ग्रंथाचा अपमान केला आहे. याचबरोबर, त्यांनी हिंदूंच्या भावनाही दुखावल्या आहेत", असे महासभेचे आग्रा जिल्हा प्रभारी सौरभ शर्मा म्हणाले. इतकेच नाही तर अखिल भारतीय हिंदू महासभेने सोमवारी आग्रा येथे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विधानाचा निषेध केला.

दरम्यान, रामचरितमानसबाबत स्वामी प्रसाद मौर्य यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांच्याच समाजवादी पक्षाच्या आमदारांनी निषेध केला आहे.  या प्रकरणी पक्षप्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती देणार असल्याचे समाजवादी पक्षाच्या आमदारांनी सांगितले.  रामचरितमानस हा असा ग्रंथ आहे, जो जगभर वाचला जातो आणि विचार केला जातो, असे समाजवादी पक्षाचे नेते मनोज पांडे म्हणाले. 

याचबरोबर, समाजवादी पक्षाचे आमदार मनोज पांडे म्हणाले की, हे पुस्तक माणसाला नैतिक मूल्ये आणि परस्पर संबंधांचे महत्त्व सांगते. आम्ही केवळ रामचरितमानसच नाही तर बायबल, कुराण आणि गुरु ग्रंथ साहिब यांचाही तितकाच आदर करतो.  हे ग्रंथ आपल्याला सर्वांसोबत राहायला शिकवतात. तसेच, अखिलेश यादव सध्या उत्तराखंडमध्ये आहेत आणि त्यांना याची जाणीव आहे.

काय म्हणाले होते स्वामी प्रसाद मौर्य?"रामचरितमानसच्या काही श्लोकांमध्ये जात, वर्ण आणि वर्गाच्या आधारावर समाजातील कोणत्याही घटकाचा अपमान केला गेला असेल तर तो धर्म नसून अधर्म आहे.  यामुळे केवळ भाजपलाच नव्हे, तर साधूसंतांवरही हल्ले करण्यास प्रवृत्त केले जाते.  रामचरितमानसच्या काही ओळींमध्ये तेली, कुम्हार यांसारख्या जातींची नावे सांगितल्यामुळे या जातींच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात", असे स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले होते. दरम्यान, स्वामी प्रसाद मौर्य यांनी पुस्तकाच्या या भागावर बंदी घालण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टी