रामानंद यांनाही अश्रू झाले अनावर.. कोलते कुटुंबीयांची घेतली भेट

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:11+5:302015-02-14T23:51:11+5:30

पाथर्डी : वाळू तस्करांच्या हल्लयात शहीद झालेल्या दीपक कोलते यांच्या पत्नीचा आक्रोश आणि आईने फोडलेला हंबरडा पाहून नाशिक परिक्षेत्र विभागाचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद यांनाही अश्रू अनावर झाले़ दीपक कोलते यांच्या मारेकर्‍यांना अटक करु तसेच कुटुंबीयांना सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन रामनंद यांनी दिले़

Ramanand also tears. Anand .. Kolte family members took a meeting | रामानंद यांनाही अश्रू झाले अनावर.. कोलते कुटुंबीयांची घेतली भेट

रामानंद यांनाही अश्रू झाले अनावर.. कोलते कुटुंबीयांची घेतली भेट

थर्डी : वाळू तस्करांच्या हल्लयात शहीद झालेल्या दीपक कोलते यांच्या पत्नीचा आक्रोश आणि आईने फोडलेला हंबरडा पाहून नाशिक परिक्षेत्र विभागाचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद यांनाही अश्रू अनावर झाले़ दीपक कोलते यांच्या मारेकर्‍यांना अटक करु तसेच कुटुंबीयांना सर्व शासकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन रामनंद यांनी दिले़
सोमवारी सकाळी माळीबाभुळगाव येथे रामानंद यांनी कोलते कुटुंबीयाची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी प्रभारी पोलीस अधिक्षक सुनीता साळुंके, उपअधीक्षक वाय. डी. पाटील उपस्थित होते. घटना घडून १३ दिवस झाले तरी या प्रकरणातील मुख्य आरोपी सापडले नाही़ पोलिसांची हत्या होऊनही प्रशासन ठोस कारवाई करीत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. तातडीने या प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे तसेच कोलते कुटुंबीयांना शासकीय सवलती मिळाव्यात, अशी मागणी रविंद्र वायकर यांनी केली.
यावेळी रामानंद म्हणाले, दीपक कोलते हा आमच्या कुटुंबातील सदस्य होता़ या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक केली जाईल़ तसेच कोलते कुटुंबीयांना शासकीय सेवेत सामावून घेवून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठीचे प्रस्ताव पाठविल्याची माहिती दिली़
़़़़़़़़़
शुक्रवारी शेवगाव पोलीस ठाण्याला रामानंद यांनी भेट देऊन पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांच्या हत्येच्या तपासाबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. दीपक कोलते यांच्या मारेकर्‍याला लवकरात लवकर गजाआड केले जाईल, असा विश्वास रामानंद यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुंगी-हातगाव मार्गावरील जायकवाडी उजव्या कालव्याजवळील घटनास्थळालाही रामानंद यांनी भेट देऊन माहिती घेतली. यावेळी शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा तपासी अधिकारी संपत भोसले उपस्थित होते.

Web Title: Ramanand also tears. Anand .. Kolte family members took a meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.