शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राम मंदिर आमच्या अजेंड्यावर नाही, भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 06:44 IST

पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने खळबळ माजताच, शहा यांनी तसे म्हटले नव्हते

नवी दिल्ली/हैदराबाद : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांआधी अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात होईल, असे वक्तव्य भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केल्याने खळबळ माजताच, शहा यांनी तसे म्हटले नव्हते आणि राम मंदिराचा विषय आमच्या अजेंड्यावरही नाही, असे भाजपाला जाहीर करावे लागले आहे.अध्यक्षांच्या विधानावरच खुलासा करण्याची वेळ आल्याने भाजपामध्ये नाराजी दिसत आहे. हैदराबादमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत शहा यांनी तसे विधान केल्याची माहिती भाजपा नेते पी. शेखर यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्या वेळी पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईल, त्यासाठीची तयारी सुरू आहे, असे अमित शहा म्हणाल्याचे शेखर यांनी पत्रकारांना सांगितले होते.त्यावर एमआयएमचे नेते असाउद्दिन ओवेसी यांनी लोकसभा निवडणुका झाल्यानंतरच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर वादाबाबत निवाडा द्यायला हवा, असे मत व्यक्त केले होते. निवडणुकांआधी निकाल लागल्यास भाजपा त्याचा राजकीय फायदा उठविण्याचा प्रयत्न करेल, असेही ते म्हणाले होते.>संत, महंतांची समजूत काढण्याचे प्रयत्नउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्याच आठवड्यात नाराज संत-महंतांची समजूत काढण्यासाठी अयोध्येत राम मंदिर नक्की होईल, पण त्यासाठी काही दिवस धीर धरा, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपा पुन्हा राम मंदिराचा मुद्दा पुढे आणण्याच्या तयारीत असल्याचे जाणवत आहे. दरवेळी निवडणुकांच्या आधी भाजपा राम मंदिराचा विषय उपस्थित करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भाजपा आता अडचणीत असल्याने तो मुद्दा बाहेर आणत आहे, अशी टीका शहा यांच्या वक्तव्यामुळे सुरू होताच, भाजपाने बचावात्मक पवित्रा घेतला. अमित शहा यांनी हैदराबादेत तसे विधान केलेच नव्हते, प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असा खुलासा दिल्लीतून केला गेला.भाजपाने २0१४ सालच्या लोकसभा निवडणुकांच्या आधीही अयोध्येत राम मंदिर उभारण्याची घोषणा केली होती. ती पूर्ण न केल्याने अनेक संत-महंत भाजपावर नाराज आहेत. त्यांनी ती नाराजी बोलूनही दाखविली आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू मते एकगठ्ठा मिळविण्यासाठीच भाजपाने हा मुद्दा आणल्याची चर्चा आहे. आपण आश्वासन पूर्ण करण्याच्या तयारीला लागल्याचेही भाजपाला दाखवायचे आहे.>मग राम मंदिर का नाही? ठाकरेपुणे : नोटाबंदी एका क्षणात केली, मग राम मंदिर का नाही करीत, असा सवाल करतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा हा फसव्या घोषणा करणारा पक्ष आहे, अशी टीका केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहRam Mandirराम मंदिरBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथ