शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर अयोध्येत नाही तर काय पाकमध्ये बांधणार ? - गिरिराज सिंह

By admin | Updated: February 7, 2017 09:26 IST

निवडणुका जवळ येताच भाजपा नेत्यांना 'श्री प्रभू राम' आठवू लागतात.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, 7 - निवडणुका जवळ येताच भाजपा नेत्यांना 'श्री प्रभू राम' आठवू लागतात. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या रणनीतींमध्ये अचानक बदल करत सर्व लक्ष केवळ राम मंदिरावर केंद्रीत केले आहे. यापूर्वी विकास कामांच्या मुद्यावर जास्त भर देणा-या भाजपाने निवडणुका जवळ येताच राम नामाचा जप सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे.  
 
पत्रकारांनी राम मंदिरासंदर्भात केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की,' राम मंदिर अयोध्येत नाही बांधणार तर काय पाकिस्तानात बांधणार?'. शिवाय, अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या मुद्याला नेहमी भाजपासोबतच का जोडले जाते. असा उलट प्रश्न उपस्थित करत त्यांनी, 'श्री राम केवळ भाजपाचेच नाही तर सर्व राजकीय पक्षांचे आहेत. हिंदू धर्माबाबत श्रद्धा असणा-या कोट्यवधी हिंदूंचे आहेत', अशी प्रतिक्रिया दिली. 
 
गिरिराज सिंह यांच्या आधी भाजपा नेते विनय कटियार यांनी राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणला. ‘ज्याप्रकारे बाबरीचा ढाचा पाडला, त्याचप्रकारे अयोध्येत राम मंदिर उभारले जाईल', असे वक्तव्य कटियार यांनी फैजाबादमधील रॅलीला संबोधित करताना केले. मात्र, भाजपाला मतदान करुन विजयी कराल तेव्हाचे हे शक्य आहे, असे सांगत त्यांनी जनतेला भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केले. 
 
सुरुवातीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नोव्हेंबरमध्ये लखनौ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राम मंदिराचा मुद्दा मांडला होता. अयोध्येत राम मंदिर निर्माण करण्यासाठी त्यांचा पक्ष कटिबद्ध आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते.  खुद्द राष्ट्रीय अध्यक्षांनी राम नामाचा जप सुरू केल्यानंतर भाजपा नेते केशव प्रसाद मौर्या यांनीही शहा यांच्या वक्तव्याशी मिळते जुळते विधान केले. आणि आता तर काय भाजपा नेते विनय कटियार यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री आदित्यनाथ योगी यांच्यापर्यंत सर्वच राम मंदिर राग आळवत आहेत.