राम रहीमच्या डे-यात ६00 जणांचे सांगाडे, अनुयायांनी दिली धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 04:13 IST2017-09-21T04:13:38+5:302017-09-21T04:13:42+5:30

बलात्कारी बाबा राम रहीमच्या सिरसा येथील डे-यामध्ये तब्बल ६00 हून अधिक लोकांचे सांगाडे व हाडे पुरून ठेवल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम रहीम सध्या रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

 Ram Rahim's Day-over 600 people shouted slogans, followers | राम रहीमच्या डे-यात ६00 जणांचे सांगाडे, अनुयायांनी दिली धक्कादायक माहिती

राम रहीमच्या डे-यात ६00 जणांचे सांगाडे, अनुयायांनी दिली धक्कादायक माहिती

सिरसा : बलात्कारी बाबा राम रहीमच्या सिरसा येथील डे-यामध्ये तब्बल ६00 हून अधिक लोकांचे सांगाडे व हाडे पुरून ठेवल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. राम रहीम सध्या रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
लोकांना मारून त्यांचे मृतदेह इथे पुरले जात असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. राम रहीमविरुद्ध आवाज उठवणाºयांना ठार मारून त्यांचे मृतदेह तिथेच जमिनीत जमीनीत पुरले असल्याचा आरोप डेºयाच्या काही माजी अनुयायांनी केला होता.
डेराची अध्यक्ष विपासना इंसा व उपाध्यक्ष डॉ. पीआर नॅन यांची हरयाणा पोलीस चौकशी करीत आहेत. त्या दोघांकडून डेºयातील अनेक कृत्यांचे पुरावे हाती येतील, असे पोलिसांना वाटत आहे. जमिनीत आणि शेतात अनेकांची हाडे व सांगाडे पुरले असल्याचे डॉ. पीआर नॅनने पोलिसांकडे मान्य केल्याचे सांगण्यात येते. डेºयामध्ये मृतदेहाचे दफन केल्यास मोक्ष मिळतो, असे भाविकांना वाटत असे, अशी माहिती डॉ. नॅनने पोलिसांना दिल्याचे कळते. हे सांगाडे बाहेर काढण्याचे काम सुरू होईल. राम रहीमची मानलेली मुलगी हनीप्रीतचा शोधही घेतला जात आहे. (वृत्तसंस्था)
>राम रहीमची मजुरी
राम रहीमला रोहतक तुरुंगात भाजी लागवडीचे काम तुरुंग प्रशासनाने दिले आहे. त्याला दिवसा ८ तास काम केल्याबद्दल २0 रुपये मजुरी मिळणार आहे.

Web Title:  Ram Rahim's Day-over 600 people shouted slogans, followers