ऑस्ट्रेलियातून सेक्सची औषधं मागवायचा राम रहीम , वाचा 10 खळबळजनक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 01:00 PM2017-09-12T13:00:56+5:302017-09-12T13:00:56+5:30

डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. दिवसेंदिवस राम रहीमबाबत नव-नवे खुलासे होत आहेत.

Ram Rahim to ask for sex drugs from Australia, read 10 sensational disclosures | ऑस्ट्रेलियातून सेक्सची औषधं मागवायचा राम रहीम , वाचा 10 खळबळजनक खुलासे

ऑस्ट्रेलियातून सेक्सची औषधं मागवायचा राम रहीम , वाचा 10 खळबळजनक खुलासे

googlenewsNext
ठळक मुद्दे. कोर्टात न्यायाधिशांनी राम रहीमला बलात्काराबाबत विचारणा केली असता मी नपुंसक आहे, मी बलात्कार कसा करू शकतो असं राम रहीमकडून सांगण्यात आलं.      राम रहीमची प्रकृती खराब होत आहे कारण ते सेक्स एडिक्ट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते ऑस्ट्रेलियाहून सेक्ससाठी औषधं मागवायचे असा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे.  

चंदीगड, दि. 12 - डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षांची शिक्षा भोगत आहे. दिवसेंदिवस राम रहीमबाबत नव-नवे खुलासे होत आहेत. या एकाहून एक खळबळजनक खुलाशांमुळे राम रहीमच्या भक्तांसह सामान्य नागरिकदेखील हैराण आहेत. 
10 खळबळजनक खुलासे-
1. कोर्टात न्यायाधिशांनी राम रहीमला बलात्काराबाबत विचारणा केली असता मी नपुंसक आहे, मी बलात्कार कसा करू शकतो असं राम रहीमकडून सांगण्यात आलं.      
2. राम रहीमची प्रकृती खराब होत आहे कारण ते सेक्स एडिक्ट आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते ऑस्ट्रेलियाहून सेक्ससाठी औषधं मागवायचे असा खुलासा एका रिपोर्टमधून झाला आहे.  
3. हनीप्रीत राम रहीमची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मात्र, बलात्काराच्या आरोपात बाबा तुरूंगात गेल्यानंतर राम रहीमचे हनीप्रीत सोबतच जवळचे संबंध असल्याचा खुलासा झाला आहे.
5. राम रहीमवर  जवळपास 400 माणसांना नपुंसक बनवण्याचा आरोप लावण्यात आला आहे. याविरोधात राम रहीमविरोधात कोर्टात केस सुरू आहे. 
6. कोर्टाच्या आदेशानुसार डे-याची झाडाझडती घेतल्यानंतर अनेक खुलासे झाले आहेत. बाबाच्या डे-यात गर्भपात सेंटर देखील मिळालं आहे. 
7. या दरम्यान राम रहीमची गुहा देखील ब-याच चर्चेत राहिली. डे-यात अशाप्रकारचे अनेक सुरंग असून ते थेट बाबाच्या बेडरूमजवळ निघतात असाही खुलासा झाला आहे.  
8. राम रहीम आपल्या डे-यात स्वतःचं प्लॅस्टिकचं चलन वापरत होता. डे-यामध्ये प्लॅस्टिकचं चलन घ्यावं लागत होतं.  
9. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर कोर्टातून राम रहीमला पळवून नेण्याचा कट होता. दत्तक मुलगी हनीप्रीतसोबत तो पळून जाणार होता असाही खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत.  
10. राम रहीमला शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. हनीप्रीतकडे असलेली एक लाल बॅग म्हणजे हिंसा भडकावण्याचा इशारा होता असाही खुलासा आता झाला आहे.  

Web Title: Ram Rahim to ask for sex drugs from Australia, read 10 sensational disclosures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.