प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने ३ संशयितांना पकडले, चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 23:25 IST2024-01-18T23:24:57+5:302024-01-18T23:25:20+5:30
Ram Mandir: २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, यूपी एटीएसने तीन संशयितांना पकडले आहे. तिघेही संशयित हे अर्श डल्ला गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे.

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यापूर्वी उत्तर प्रदेश एटीएसने ३ संशयितांना पकडले, चौकशी सुरू
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान, यूपी एटीएसने तीन संशयितांना पकडले आहे. तिघेही संशयित हे अर्श डल्ला गँगचे सदस्य असल्याची माहिती समोर येत आहे.
डीजी कायदा आणि सुव्यवस्था यांनी सांगितले की. तपासणी मोहिमेदरम्यान, तीनही संशयितांना अयोध्या जिल्ह्यातून एटीएसने ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या संशयितांचा कुठल्या संघटनेशी संबंध आहे, हे समोर आलेले नाही. मात्र अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
अयोध्येतील रामललांच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. एसपीजी, सीआयएसएफ, स्पेशल कमांडो, सीआरपीएफ, एनएसजी आणि एटीएस यांनी अयोध्येमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा मोर्चा सांभाळलेला आहे. अयोध्येजवळच्या सर्व सीमा सिल करण्यात आल्या आहेत.
अयोध्येत राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी रामललांची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. या सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य यजमानांच्या रूपामध्ये उपस्थित असलीत. नरेंद्र मोदींसोबत आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह हजारो व्हीआयपी निमंत्रित उपस्थित राहणार आहेत, त्या मुळे अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.