Ayodhya : राम मंदिरासाठी जमीन खरेदी वादात; AAP खासदार म्हणाले, '20 लाखांची जमीन अडीच कोटींमध्ये विकत घेतली'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 08:50 AM2021-06-20T08:50:47+5:302021-06-20T08:51:29+5:30

Ram Mandir Trust Land Purchase : भाजपावर निशाणा साधत खासदार संजय सिंह म्हणाले की, देशभरातील कोट्यवधी गरीब, सामान्य लोक, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी आणि कामगार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देणगी देत आहेत, परंतु भाजपा नेते देणगीचे पैसे चोरुन भ्रष्टाचार करत आहेत.

ram mandir trust land purchase controversy mayor nephew sold land worth 20 lakhs in crores | Ayodhya : राम मंदिरासाठी जमीन खरेदी वादात; AAP खासदार म्हणाले, '20 लाखांची जमीन अडीच कोटींमध्ये विकत घेतली'

Ayodhya : राम मंदिरासाठी जमीन खरेदी वादात; AAP खासदार म्हणाले, '20 लाखांची जमीन अडीच कोटींमध्ये विकत घेतली'

Next

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्यामध्येराम मंदिरासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) खरेदी केलेल्या जमिनीतील घोटाळ्यासंदर्भात एकामागून एक नवीन खुलासे करण्यात येत आहेत. यावरून समाजवादी पार्टी आणि काँग्रेससह आम आदमी पार्टी राम मंदिर ट्रस्टच्या आरोपी विश्वस्तांसह भाजपा नेत्यांवर निशाणा साधताना दिसून येत आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी पुन्हा एकदा राम मंदिरासाठी खरेदी करण्यात येत असलेल्या जमीन घोटाळ्यासंदर्भातील इतर पुरावे सादर केले आहेत. तसेच,अयोध्यामधील भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकांवर स्वस्त दराने जमीन खरेदी केल्याचा आणि राम मंदिर ट्रस्टला अनेक पटींनी विकल्याचा केल्याचा आरोप केला आहे.

राजधानी लखनौमध्ये संजय सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अयोध्येत भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय यांचे पुतणे दीप नारायण यांच्याकडून 20 फेब्रुवारी 2021 रोजी अवघ्या 20 लाख रुपयात खरेदी केली होती. मग ती राम मंदिर ट्रस्टला 11 मे 2021 रोजी अडीच कोटींमध्ये विकली. त्याचप्रमाणे अयोध्याच्या कोट रामचंदरमधील जगदीश प्रसाद यांना 14.80 लाखांची जमीन महंत देवेंद्र प्रसाद यांच्याकडून 10 लाख रुपयांना मिळते. मात्र, रामजन्मभूमी ट्रस्टला 1 कोटी 60 लाखांची जमीन 4 कोटींना दिली जाते, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या संपूर्ण प्रकरणात भाजपाचे महापौर आणि त्याचा पुतण्या सामील असल्याचा आरोपही संजय सिंह यांनी केला आहे.

चौकशीची मागणी
संजय सिंह म्हणाले, 'राम मंदिर जमीन घोटाळ्याचा आरोप असलेल्या भाजपाचे महापौर हृषिकेश उपाध्याय आणि विश्वस्त यांच्याशी संबंधित लोकांच्या खात्यांची चौकशी करण्याची मागणी योगी सरकारकडे आम आदमी पार्टीने केली आहे. ज्यामुळे देणगी चोरीचा संपूर्ण खेळ उघडकीस येईल.' तसेच, फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून राम मंदिराच्या नावावर जमीन खरेदी घोटाळ्यासंदर्भातील सुनावणी करून आरोपींना त्वरित तुरूंगात पाठवावे, असेही संजय सिंह यांनी सांगितले.

भाजपावर निशाणा
भाजपावर निशाणा साधत खासदार संजय सिंह म्हणाले की, देशभरातील कोट्यवधी गरीब, सामान्य लोक, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी आणि कामगार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देणगी देत आहेत, परंतु भाजपा नेते देणगीचे पैसे चोरुन भ्रष्टाचार करत आहेत. यामुळे अयोध्येत राम मंदिर बांधण्यास विलंब होत आहे. राम मंदिराच्या नावावर 2 कोटींची जमीन 18.5 कोटींमध्ये विकली गेल्याच्या खुलाशाच्या 6 दिवसानंतरही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे सरकार या देणगी चोरांना वाचवू इच्छित असल्याचे सिद्ध होते. ज्यावेळी भाजपा नेते देणगी चोरीमध्ये सामील होतात, मग सरकार त्यांच्याविरोधात कारवाई तरी कशी करू शकेल?, असा सवाल संजय सिंह यांनी केला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ram mandir trust land purchase controversy mayor nephew sold land worth 20 lakhs in crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app