शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

सरकार कोणाचंही आलं तरी राम मंदिर होणारच- भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 8:17 AM

राम मंदिराबद्दल मोहन भागवत यांचं महत्त्वपूर्ण विधान

देहरादून: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी राम मंदिराबद्दल महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. 2014 मध्ये राम मंदिराचा मुद्दा नव्हता. तेव्हा राम मंदिराचा मुद्दा नसता, तरीही सरकार स्थापन झालं असतं. मात्र 2019 मध्ये भाजपा राम मंदिर सर्वात महत्त्वाचा विषय आहे, असं भागवत यांनी म्हटलं. ते देहरादूनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 2014 मध्ये देशात एक दुसरी लाट होती. ती राम मंदिरापेक्षा वेगळी होती. मात्र यावेळी राम मंदिराचा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. भगवान राम आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहेत. सरकार कोणाचंही येवो, राम मंदिराची उभारणी व्हायलाच हवी. असं न झाल्यास संतांशी चर्चा करुन आम्ही योग्य ती कार्यवाही करु, असं सूचक विधान सरसंघचालकांनी केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विधानांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'नितीन गडकरींचा स्वभाव अतिशय सौम्य आहे. कटकारस्थान करणं हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांच्या मनात जर काही इच्छा असेल, तर ते सर्वात आधी मला सांगतील,' असं भागवत म्हणाले. नितीन गडकरींनी गेल्या काही दिवसांमध्ये अनेक विधानं केली आहेत. लोकांनी दाखवलेली स्वप्नं पूर्ण झाली नाहीत, तर लोक धुलाई करतात, असं गडकरींनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यावेळी गडकरींचा निशाणा पंतप्रधान मोदींवर असल्याची चर्चा झाली होती. मोहन भागवत यांनी आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिकादेखील स्पष्ट केली. मी कायम आरक्षणाच्या बाजूनं आहे. मात्र आरक्षण जाती आणि धर्माच्या आधारे न देता ते गरजूंना द्यायला हवं, असं भागवत म्हणाले. आरक्षणामागचं राजकारण मुख्य समस्या असल्याचंही त्यांनी म्हटलं. याआधी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीवेळी भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यावेळी संघाला आरक्षण संपवायचं आहे, असा प्रचार जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी केला होता. याचा मोठा फटका भाजपाला निवडणुकीत बसला अशी चर्चा राजकीय वर्तुळात झाली होती.  

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघRam Mandirराम मंदिरBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९