साईभक्तीमुळे उमा भारतींवर 'राम' नाराज - स्वरुपानंद
By Admin | Updated: June 29, 2014 17:13 IST2014-06-29T16:37:16+5:302014-06-29T17:13:05+5:30
उमा भारती यांच्या साईभक्तीमुळेच 'राम' त्यांच्यावर नाराज आहेत. म्हणूनच त्यांना राम मंदिर अभियानात अपयश आले अशा शब्दांत द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद यांनी उमा भारतींवर प्रहार केला आहे.

साईभक्तीमुळे उमा भारतींवर 'राम' नाराज - स्वरुपानंद
ऑनलाइन टीम
हरिद्वार, दि. २९ - उमा भारती यांच्या साईभक्तीमुळेच 'राम' त्यांच्यावर नाराज आहेत. साईभक्तीमुळेच उमा भारतींना राम मंदिर अभियानात अपयश आले अशा शब्दांत द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद यांनी उमा भारतींवर प्रहार केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून साईबांबांवरुन वाद निर्माण झाला आहे. साईबाबा देव नव्हते असे विधान करत शंकराचार्य स्वरुपानंद यांनी हा वाद ओढवून घेतला होता. याविरोधात देशभरातून स्वरुपानंद यांच्यावर टीका होत असून संतप्त साईभक्तांनी शंकराचार्यांविरोधात निदर्शनेही केली. शनिवारी केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारतींनीही साईभक्तांचे समर्थन केले होते. 'शंकराचार्य हे माझ्या पित्यासमान असल्याने मी काही बोलणार नाही. पण साईबाबांनी स्वतःला कधीच देव म्हणवून घेतले नाही. भक्तांनीच त्यांना देवत्व मिळवून दिले. साईबाबांचे मंदिर बांधण्यास विरोध व्हायला नको असे उमा भारतींनी म्हटले होते.
उमा भारतींच्या या विधानावर शंकराचार्य स्वरुपानंद यांनी अत्यंत तिखट शब्दांमध्ये टीका केली. स्वरुपानंद म्हणाले, उमा भारतींनी धार्मिक बाबींमध्ये ढवळाढवळ करु नये. त्या देव नसून फक्त मंत्री आहेत. साईभक्तींमुळेच राम त्यांच्यावर नाराज आहे.