राखी सावंतचा पोलिसांना गुंगारा?

By Admin | Updated: April 5, 2017 05:01 IST2017-04-05T05:01:56+5:302017-04-05T05:01:56+5:30

हिंदी चित्रपटांतील आयटम गर्ल राखी सावंतला अटक केल्याच्या बातम्या मंगळवारी दिवसभर पसरल्यानंतर त्या वृत्ताचे पंजाब पोलिसांनी खंडन केले

Rakhi Sawant's police complaint? | राखी सावंतचा पोलिसांना गुंगारा?

राखी सावंतचा पोलिसांना गुंगारा?

लुधियाना : हिंदी चित्रपटांतील आयटम गर्ल राखी सावंतला अटक केल्याच्या बातम्या मंगळवारी दिवसभर पसरल्यानंतर त्या वृत्ताचे पंजाब पोलिसांनी खंडन केले. पोलिसांचे पथक राखी सावंतला अटक करण्यासाठी तिच्या घरी गेले होते. पण त्यावेळी राखी घरी नव्हती, अशी माहिती लुधियानाचे पोलीस आयुक्त कुंवर विजय प्रताप सिंग यांनी दिली. राखी सावंतने महर्षी वाल्मिकींविषयी अनुदार उद्गार काढल्यामुळे लुधियानाच्या न्यायालयाने तिच्या अटकेचे वॉरण्ट बजावले आहे. राखीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. याबबात न्यायालयाला माहिती दिली जाईल, असे लुधियानाचे पोलीस उपायुक्त धुमान निंबले म्हणाले.

Web Title: Rakhi Sawant's police complaint?