rakesh tikait replied on oxygen suppliers who claims their vehicles getting late because of farmers protest | Farmers Protest: कोरोना झाला तरी चालेल, पण घरी जाणार नाही; राकेश टिकैत यांचा निर्धार

Farmers Protest: कोरोना झाला तरी चालेल, पण घरी जाणार नाही; राकेश टिकैत यांचा निर्धार

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास विलंबशेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दावे फेटाळलेऑक्सिजन निर्मात्यांचा बोलविता धनी शोधून काढू - टिकैत

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक सुरू असून, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स, कोरोना लस यांचा तुटवडा जाणवत आहे. तर, दुसरीकडे अद्यापही दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहेत. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत ऑक्सिजनचा पुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात भाष्य करताना भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कोरोना झाला, तरी चालेल पण घरी जाणार नाही, असा निर्धार केला आहे. (rakesh tikait replied on oxygen suppliers who claims their vehicles getting late because of farmers protest)

दिल्लीसह देशभरातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिल्लीच्यी सीमांवरील महामार्गांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे ऑक्सिजन पोहोचण्यास विलंब लागत आहे, असा दावा काही ऑक्सिजन निर्मात्यांनी केला आहे. या दाव्याला राकेश टिकैत यांनी फेटाळून लावत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

वाढत्या मागणीमुळे अन्य राज्यांतून ५०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा: राजेश टोपे

काही झाले, तरी घरी जाणार नाही

ऑक्सिजन निर्मात्यांचा दावा चुकीचा असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी टिकैत यांनी केली आहे. तसेच येथे आम्ही क्वारंटाइन झालेलो आहोत. आम्ही घरी जाऊ. परंतु, दिल्लीतील रोग घेऊन जाणार नाही. कोरोना झाला, तरी येथील मॅक्स रुग्णालयात उपचार घेऊ, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. याशिवाय दिल्ली सीमांवरून वाहने विनाअडथळा, न थांबता पुढे जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

निर्मात्यांचा बोलविता धनी शोधून काढू

ऑक्सिजन निर्मात्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. यामागे नेमके कोण आहे, याचा शोध घेऊ. रुग्णवाहिकेसह शेकडो वाहने या मार्गावरून व्यवस्थितपणे ये-जा करत आहेत. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणारी वाहने कुठे थांबताहेत, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला. या मार्गावरून दिवसाला सुमारे ३०० रुग्णवाहिका प्रवास करत असल्याचेही ते म्हणाले. शेतकरीविरोधी वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत, याची नक्कीच चौकशी करण्यात येईल, असेही राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.   

महाराष्ट्रातील सरकारसोबत कधी चर्चा केलीय का? फडणवीसांचा प्रियंका गांधींना प्रतिप्रश्न

दरम्यान, यूपी गेट परिसरात शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आताच्या घडीला येथे लावण्यात आलेले बहुतांश टेंट रिकामे झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी फ्लायओव्हरखाली, दिल्ली-मेरठ हायवेवर अनेक ठिकाणी टेंट लावले होते. या परिसरात २५ मोठे, ७० मध्यम आणि १०० छोटे टेंट लावण्यात आले होते. १७ ठिकाणी लंगर चालू होते. सध्या येथे ३०० ते ४०० आंदोलनकर्ते शेतकरी राहिले आहेत. त्यातील १००  शेतकरी आसपासच्या गावातील आहेत. जे आंदोलनस्थळी येऊन-जाऊन असतात. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rakesh tikait replied on oxygen suppliers who claims their vehicles getting late because of farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.