RajyaSabha: पीटी उषा आणि इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेवर जाणार, PM नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 20:56 IST2022-07-06T20:55:52+5:302022-07-06T20:56:04+5:30

देशातील महान धावपटू पीटी उषा आणि महान संगीतकार इलैयाराजा यांच्यासह वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद राज्यसभेवर जाणार आहेत.

RajyaSabha: Athlete PT Usha - Singer Ilaiyaraaja and 2 others nominated to RajyaSabha | RajyaSabha: पीटी उषा आणि इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेवर जाणार, PM नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

RajyaSabha: पीटी उषा आणि इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेवर जाणार, PM नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

नवी दिल्ली: भारताची महान धावपटू पीटी उषा आणि महान संगीतकार इलैयाराजा यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेवर पाठवले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

पीटी उषांबद्दल माहिती देताना पीएम मोदी म्हणाले की, पीटी उषा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वत्र ओळखल्या जातात. यासोबतच नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे कामही तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.


इलैयाराजा यांचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, इलैयाराजा यांनी पिढ्यानपिढ्या लोकांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या रचना अनेक भावनांचे सुंदर चित्रण करतात. ते अतिशय नम्र असून, त्यांनी बऱ्याच गोष्टी साध्य केल्या आहेत. त्यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याचा आनंद आहे.

वीरेंद्र हेगडे यांनाही राज्यसभेवर पाठवले जात आहे. त्यांच्याबद्दल माहिती देताना पीएम मोदी म्हणाले की, ते समाजसेवेत आघाडीवर आहेत. मला धर्मस्थळ मंदिरात प्रार्थना करण्याची आणि आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेले महान कार्य पाहण्याची संधी मिळाली. ते संसदीय कामकाज नक्कीच समृद्ध करेल. 

या तीन लोकांशिवाय व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेवर पाठवले जात आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्याबद्दल पंतप्रधान म्हणाले की, ते अनेक दशकांपासून सर्जनशील जगाशी जोडलेले आहेत. त्यांच्या कलाकृतींतून भारताच्या वैभवशाली संस्कृतीचे दर्शन घडते आणि जागतिक स्तरावर त्यांचा ठसा उमटला आहे. राज्यसभेवर नामनिर्देशित झाल्याबद्दल अभिनंदन.

Web Title: RajyaSabha: Athlete PT Usha - Singer Ilaiyaraaja and 2 others nominated to RajyaSabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.