शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
6
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
7
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
8
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
9
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
10
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
11
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
12
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
13
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
14
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
15
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
16
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
17
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
18
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
19
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

खासदाराच्या मुलीने फुटपाथवरच्या तरुणाला चिरडून मारलं; आरोपीला पोलीस ठाण्यातूनच मिळाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 16:04 IST

चेन्नईत एका राज्यसभेच्या खासदाराच्या मुलीने फुटपाथवर झोपलेल्या एका माणसावर आपली बीएमडब्ल्यू चढवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Chennai BMW Car Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणाने देशभरात खळबळ उडालेली असताना चेन्नईमध्येही हिट अँड रनचे हारदवणारे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात एका तरुणाचा नाहक बळी गेला. चेन्नईतीलराज्यसभा खासदाराच्या मुलीने बीएमडब्ल्यू कार फूटपाथवर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावर घालून त्याची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर खासदाराच्या मुलीला पोलीस ठाण्यातूनच जामीन मंजूर करण्यात आला. या हायप्रोफाईल प्रकरणाची आता दोन दिवसांनी देशपातळीवर चर्चा सुरु झाली आहे. 

चेन्नईतील बेसंट नगरमध्ये हा अपघात घडला. वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार बिदा मस्तान राव यांची मुलगी माधुरी चौधरी ही आरोपी आहे. माधुरीने भरधाव बीएमडब्ल्यू कार फूटपाथवर झोपलेल्या २४ वर्षीय सूर्याच्या अंगावर घातली. यामध्ये सूर्याचा मृत्यू झाला. सूर्या हा पेंटर म्हणून काम करुन आपलं पोट भरत होता. आठ महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. महत्त्वाची बाब म्हणजे माधुरी चौधरी अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत होती. अपघातानंतर तिच्या मैत्रिणीने तिथल्या लोकांशी हुज्जतही घातली. तिने लोकांना धमक्या दिल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बऱ्याच दबावानंतर पोलिसांनी आरोपी माधुरीला पकडले होते. मात्र पोलीस ठाण्यातच तिला जामीन देऊन घरी पाठवण्यात आले. 

सोमवारी रात्री हा अपघात झाला. माध्यमांच्या वृत्तानुसार, माधुरी अपघाताच्या वेळी दारूच्या नशेत होती आणि ती गाडी चालवत होती. कारमध्ये तिची एक मैत्रिणही होती. माधुरीने फूटपाथवर झोपलेल्या सूर्यावर कार चढवल्यानंतर तिथून पळ काढला. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने गाडीतून खाली उतरत जमलेल्या लोकांशी वाद घातला. त्यानंतर काही वेळाने तीही निघून गेली. गर्दीतल्या काही लोकांनी सूर्याला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी तपासानंतर खासदाराच्या मुलीला अटक केली होती मात्र तिची जामिनावर सुटका करण्यात आली होती. आरोपीची जामीनावर सुटका केल्यामुळे वायएसआर काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि स्थानिक पोलीस प्रशासनावर लोकांकडून जोरदार टीका केली जात आहे.

कोण आहेत बीडा मस्तान राव?

बीडा मस्तान राव हे आंध्र प्रदेशचे नेते आणि व्यापारी आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १६५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. बीडा मस्तान यांची कंपनी बीएमआर ग्रुप सीफूड उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे. बीडा मस्तान राव २००९ ते २०१९ पर्यंत टीडीपीमध्ये होते. या काळात ते आंध्र प्रदेशातील कावली मतदारसंघाचे आमदार होते. २०१९ मध्ये त्यांनी वायएसआरसीपीमध्ये प्रवेश केला. २०२२ मध्ये ते वायएसआरसीपीमधून खासदार झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातChennaiचेन्नईRajya Sabhaराज्यसभा