शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, बिहार, बंगाल ते तामिळनाडू...राज्यसभेच्या 37 पैकी भाजप-काँग्रेसला किती जागा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 18:54 IST

Rajya Sabha Elections: दहा राज्यातील राज्यसभेच्या 37 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार असून, त्याच दिवशी निकाल लागेल.

Rajya Sabha Elections: राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, येत्या 16 मार्च रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहेत. सध्या या 37 पैकी 12 जागा NDA कडे, तर 25 जागा विरोधकांकडे आहेत. यंदाच्या निवडणुकीत NDA ला आपली संख्या वाढवण्याची संधी आहे, तर दुसरीकडे मित्रपक्षांमधील जागावाटप हे मोठे आव्हान ठरणार आहे.

ज्या राज्यांमध्ये राज्यसभा निवडणूक होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र, ओडिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.

बिहार: 

बिहारमध्ये 5 राज्यसभा जागा रिक्त होत आहेत. एक जागा जिंकण्यासाठी 41 आमदारांचे मत आवश्यक आहे. सध्या NDA कडे 202 आमदार आहेत, (205 मतांची गरज) तर विरोधकांकडे 35 आमदार आहेत. याशिवाय, AIMIM (5) आणि BSP (1) विरोधकांसोबत आल्यास विरोधक एक जागा काढू शकतात. मात्र NDA विरोधी आमदारांमध्ये फूट पाडू शकते, अशीही चर्चा आहे.

NDA चे संभाव्य सूत्र:

BJP: 2

JDU: 2

1 जागा सहयोगी पक्षाला

मात्र ही जागा LJP (रामविलास), HAM किंवा राष्ट्रीय लोक मोर्चा यापैकी कोणाला मिळणार, हाच खरा पेच आहे. येथे विरोधकांपेक्षा मित्रपक्ष व्यवस्थापन मोठे आव्हान आहे.

महाराष्ट्र: 

महाराष्ट्रात 7 राज्यसभा जागा रिक्त होत आहेत. 288 सदस्यांच्या विधानसभेत एका जागेसाठी 37 मते आवश्यक आहेत. सध्या महायुतीकडे 235 आमदार असून, 6 जागा सहज जिंकू शकते. मात्र, शिंदेसेना 2 जागांची मागणी करत आहे. अशा परिस्थितीत भाजप 3 + 1 (RPI) असे सूत्र राबवू शकते. येथेही अंतर्गत वाटाघाटी निर्णायक ठरणार आहेत.

तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओडिशा

तमिळनाडू (6 जागा)

DMK: 4 जागा निश्चित

AIADMK: 1 जागा सुरक्षित

1 जागेसाठी चुरस संभवते

पश्चिम बंगाल (5 जागा)

TMC: 4 जागा राखू शकते

BJP: 1 जागेवर लक्ष

ओडिशा (4 जागा)

सध्या: BJP 2, BJD 2

नव्या समीकरणात:

BJP: 3 जागा

BJD: 1 जागा

इतर राज्ये: NDA ला मर्यादित फायदा

हरियाणा (2 जागा): BJP 1, काँग्रेस 1

छत्तीसगड (2 जागा): BJP 1, काँग्रेस 1

तेलंगणा (2 जागा): दोन्ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता

आसाम (3 जागा): BJP 2; तिसरी जागा काँग्रेस-AIUDF मध्ये चुरस

हिमाचल प्रदेश (1 जागा): काँग्रेसच्या बाजूने झुकाव

एकूण चित्र काय सांगते?

NDA ला 2-3 जागांचा फायदा होण्याची शक्यता, तर INDIA आघाडीला 3-4 जागांचा फटका बसू शकतो. BJP च्या जागा 9 वरून 12 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसलाही 4-5 जागांचा लाभ होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Rajya Sabha Elections: BJP, Congress eye gains in 37 seats.

Web Summary : Rajya Sabha elections for 37 seats see NDA aiming to increase its numbers. Maharashtra, Bihar key battlegrounds with seat-sharing challenges. BJP may gain 2-3 seats, Congress 4-5, impacting overall balance.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2026BJPभाजपाcongressकाँग्रेस