शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

आता लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत मोदी सरकार; 6 ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 16:50 IST

private member bill on population control : भाजप खासदार राकेश सिन्हा यांचे लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील (Population control) प्रायव्हेट मेंबर बिल आणले गेले आहे. 6 ऑगस्टला राकेश सिन्हा यांच्या या प्रायव्हेट मेंबर बिलावर चर्चा होऊ शकते.

नवी दिल्ली - लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची तयारी सुरू झाली आहे. आता यासंदर्भात 6 ऑगस्टला प्रायव्हेट मेंबर बिलावर (Pvt member bill) राज्यसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजप खासदार राकेश सिन्हा यांचे लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातील (Population control) प्रायव्हेट मेंबर बिल आणले गेले आहे. 6 ऑगस्टला राकेश सिन्हा यांच्या या प्रायव्हेट मेंबर बिलावर चर्चा होऊ शकते. तसेच, राज्यसभा सदस्य अनिल अग्रवाल यांचेही यासंदर्भातील प्रायव्हेट मेंबर बिल देण्यात आले आहे. (Rajya sabha to discuss private member bill on population control likely on 6th August 2021)

संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत चालेल. यात कालावधीत 19 बैठका (कामकाजाचे दिवस) होतील. कोरोनाचा धोका लक्षात घेत पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू आहे. 18 जुलैला सभागृह नेत्यांची बैठक होईल. यानंतर, सभागृहाचे कामकाज सुरू करण्यासाठी बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीची बैठक होईल. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जारी केले होते लोकसंख्या धोरण -जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण 2021-2030 जारी केले होते. ते म्हणाले होते, की वाढती लोकसंख्या विकासातील एक मोठा अडथळा आहे.तसेच, असाही दावा केला जात आहे, की आरएसएसच्या हस्तक्षेपाने लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला थेट फायदा होईल, असेही आरएसएसचे मत आहे. 

Yogi Adityanath: योगींनी जाहीर केला लोकसंख्या नियंत्रणाचा अ‍ॅक्शन प्लॅन; म्हणाले 'विकासात बाधा'

विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केले प्रश्न - उत्तर प्रदेश सरकारने आणलेल्या नव्या लोकसंख्या धोरणावर विश्व हिंदू परिषदेने (Vishva Hindu Parishad) प्रश्न उपस्थित केले आहे. यासंदर्भात विश्व हिन्दू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी यूपी लॉ कमिशनला पत्रही लिहिले आहे.

विश्व हिंदू परिषदेने विधेयकातील एक अपत्य धोरणावर पश्न उपस्थित केले आहेत. विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे, की पब्लिक सर्वंट अथवा इतरांना एक अपत्य असल्यास इंसेंटिव्ह देण्यासंदर्भात बोलले गेले आहे. हा नियम बदलायला हवा.

'वन चाइल्ड पॉलिसीचा नकारात्मक प्रभाव' -विश्व हिन्दू परिषदेने म्हटले आहे, की दोन अपत्यांचे धोरण लोकसंख्या नियंत्रणकडे घेऊन जाते. मात्र, दोनपेक्षा कमी अपत्याचे धोरण येणाऱ्या काळात अनेक नकारात्मक प्रश्न निर्माण करू शकते.

 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा