शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

ममतांना काँग्रेसची टाळी, राज्यसभेतही भाजपाला धक्का देण्यासाठी कर्नाटकी खेळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 16:07 IST

भाजपाविरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेसचा पुढाकार

नवी दिल्ली: राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत स्वत: उतरण्याऐवजी काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना टाळी देणार आहे. उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आकडे अनुकूल असूनही काँग्रेसनं तृणमूलच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 मधील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाविरोधी पक्षांमधील 'ममता' वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. कर्नाटकमध्येही काँग्रेसनं अशीच खेळी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीत विरोधकांची एकजूटही दिसून आली होती. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसकडून सुखेंदू सेखर रॉय यांनी राज्यसभेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. 1969 ते 1977 या आठ वर्षांचा अपवाद वगळता राज्यसभेचं उपसभापतीपद कायम काँग्रेसकडे राहिलं आहे. 245 जागा असलेल्या राज्यसभेत काँग्रेसचे 51 खासदार आहेत. सध्या पी. जे. कुरियन यांच्याकडे राज्यसभेचं उपसभापतीपद असून त्यांचा कार्यकाळ संपत आला आहे. 18 जुलैपासून सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उपसभापतीपदासाठी निवडणूक होईल.  उपसभापतीपदाच्या निवडणुकीमुळे कर्नाटकपाठोपाठ विरोधकांची एकजूट दाखवण्याची आणखी एक संधी काँग्रेसला मिळाली आहे. ही संधी 'हाता'तून निसटू नये, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. उपसभापतीपद भाजपाला मिळू नये, यासाठी काँग्रेसनं तृणमूलच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. यासाठी काँग्रेसला बिजू जनता दल आणि तेलंगणा राष्ट्र समितीच्या मदतीची आवश्यकता आहे. हे दोन्ही पक्ष तृणमूलला अनुकूल आहेत. याआधी 26 वर्षांपूर्वी म्हणजेच 1992 मध्ये राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत नजमा हेपतुल्ला काँग्रेसच्या उमेदवार होत्या. हेपतुल्ला आता भाजपामध्ये आहेत. त्या निवडणुकीत हेपतुल्ला यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवार रेणुका चौधरी यांचा पराभव केला होता.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाMamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिकाNarendra Modiनरेंद्र मोदी